कुभेफळ ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर; कामात भ्रष्टाचार केल्याने सरपंच आणि ग्रामसेवकाला ६८ हजार रुपये भरण्याचे आदेश.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- कुभेफळ ता परंडा येथे ग्राम पंचायतीच्या विकासकामांत भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठे वत कुभेफळ येथील सरपंच आणि ग्रामसेवकावर प्रशास कीय कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
  • विकासकामे पूर्ण न करता ६८,२०० रुपयांचा अपहार के ल्याप्रकरणी गट विकास अधिकारी (BDO) विनोद जाधव यांनी कडक पावले उचलली असून संबंधित रक्कम १५ दिवसांच्या आत शासकीय खात्यात जमा करण्याचे आदे श दिले आहेत.
  • मिळालेल्या माहितीनुसार, कुभेफळ ग्रामपंचायती अंतर्गत काही विकासकामे मंजूर करण्यात आली होती.
  • मात्र, प्रत्यक्षात ही कामे न करताच निधीचा विनियोग के ल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. एकूण ६८,२०० रुपयांची ही अफरातफर असल्याचे समोर आले आहे.
  • या गंभीर प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर पंचायत समिती स्तरावर चौकशी करण्यात आली.
  • गट विकास अधिकारी विनोद जाधव यांनी या प्रकरणाची दखल घेत सरपंच आणि ग्रामसेवकाला नोटीस बजावली आहे.
  • शासनाची दिशाभूल करून लाटलेली ही रक्कम १५ दिव सांच्या मुदतीत शासकीय तिजोरीत जमा करावी, असे स्प ष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
  • विहित मुदतीत रक्कम जमा न केल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
  • या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भ्रष्ट कारभार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
  • (वरील सरपंच / ग्रामशेवक यांणा 68200 रुपय भरणा करण्यासाठी गट विकास अधिकारी विनोद जाधव याणी दिलेले आदेश.
  • तक्रारदार उपसरपंच फारूक शेख यांणा मान्य नाही वि स्तार अधिकारी कोठे याणी चुकीचे पंचनामा करून खोटा अहवाल दाखल केले व सूनावनी मध्ये गट विकास अधि कारी याणी तक्रारदार यांचे म्हणने आयकून न घेतल्याने म्हणून आदेश मान्य नाही.)
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles