श्री.वडचीआई चरणी समर्पित सेवा: होळी उत्सवातील विराचे रोमट उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : रायपाटण : प्रमोद तरळ :- राजापूर तालु क्यात प्रसिद्ध असलेल्या रायपाटण गावातील पारंपरिक होळी उत्सवाच्या निमित्ताने विराचे रोमट आज पंचक्रोशी तील हजारो श्री वडचीआई भक्तांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
  • ढोल-ताशांच्या गजरात, जयघोषांच्या वातावरणात आणि भक्तिमय उत्साहात पार पडलेल्या या मिरवणुकीने संपूर्ण परिसर भारावून गेला होता.
  • या मिरवणुकीत विविध गावांमधून आलेल्या भक्तांनी मो ठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
  • महिलांचा उत्साही सहभाग, मुंबईतून आलेले चाकरमानी तसेच लहान मुलांची उपस्थिती यामुळे उत्सवाला वेगळीच रंगत आली होती.
  • यावेळी गांगण मंडळीच्या वतीने मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भक्तांसाठी विविध प्रकारच्या थंडगार सरबतांची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती.
  • उष्ण वातावरणात नाचत-गात सहभागी झालेल्या भावि कांची तहान भागवण्याचे हे सेवाकार्य अत्यंत नियोजनब द्ध व मनोभावे पार पडले.
  • या उपक्रमामुळे अनेक भक्तांनी समाधान व्यक्त करत गांगण मंडळीचे कौतुक केले. गावातील ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अधिकच उत्साहपूर्ण झाला.
  • संपूर्ण आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असून, स्व यंसेवकांनी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली.
  • दरवर्षीप्रमाणे यंदाही गांगण मंडळीने हा उपक्रम श्री वड चीआईच्या चरणी अर्पण करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
  • या सेवाभावी कार्यामुळे उत्सवाची शोभा अधिकच वाढली असून, उपस्थित भाविकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वा गत केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles