
तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात; फॉर्च्युनरचा धडक, सुदैवाने बचावले.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- भिगवणजवळील डाळज २ गावच्या हद्दीत, पुणे-सोलापूर महामार्ग वेळ: १९ मार्च २०२६,मध्यरात्री १ च्या सुमारास अपघाताचे स्वरूप: धनंजय सावंत हे मुंबईहून परंड्याकडे आपल्या फॉर्च्युनर कारने (क्रमांक MH 12 SE 5559) येत असताना समो रून येणाऱ्या एका कंटेनरने (क्रमांक MH 12 WJ 63 74) त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.
- नुकसान: ही धडक इतकी भीषण होती की फॉर्च्युनरच्या चालकाच्या बाजूचा पूर्ण भाग दबलेला आहे.
- प्रकृती: या भीषण अपघातातून धनंजय सावंत सुदैवाने बचावले असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.

- मात्र, त्यांचे चिरंजीव, कारचालक आणि सुरक्षारक्षक किर कोळ जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- पार्श्वभूमी: धनंजय सावंत यांनी कालच (बुधवारी) मुंबईत अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला होता. हा सोहळा आटोपून गावी परतत असताना हा अप घात घडला.
- धनंजय सावंत यांची प्रतिक्रिया:
- “कार्यकर्त्यांचे प्रेम आणि ईश्वराच्या कृपेमुळे मी या भीषण अपघातातून सुखरूप बाहेर आलो आहे. प्रकृती स्थिर अ सून कोणीही काळजी करू नये,” असे त्यांनी प्रसारमाध्य मांशी बोलताना सांगितले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











