
माहिती अधिकारात माहिती दडपणे पडले महागात; आलेश्वर ग्रामपंचायचे तत्कालीन ग्रामसेवकाला १० हजार रुपयांचा दंड.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली माहिती वेळेत न देणे आणि वरि ष्ठ कार्यालयांच्या आदेशांचे उल्लंघन करणे परंडा तालुक्या तील आलिशोर ग्रामपंचायत चे तत्कालीन ग्रामसेवकाला चांगलेच महागात पडले आहे.
- राज्य माहिती आयुक्तांच्या खंडपीठाने याप्रकरणी कडक पाऊल उचलत संबंधित ग्रामसेवकाला १० हजार रुपयां चा दंड ठोठावला आहे.

- नेमके प्रकरण काय….?
- अर्जदार फारूक बादशहा मुलानी यांनी ३० डिसेंबर २०२२ रोजी माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मागितली होती.
- माहितेचे स्वरूप आपल्या कार्यालयाकडे केंद्र व राज्य सर कारचे निधी आले कीति व खर्च खोटे खोटे करण्यात आले.
- ही सर्व सत्य प्रति नकला मिळावे म्हणून मात्र,जन माहिती अधिकाऱ्यांनी विहित मुदतीत माहिती न दिल्याने फारुक मुलानी यांनी १२ जानेवारी २०२२ रोजी विस्तार अधिका री, पंचायत समिती परंडा यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले होते.

- या अपिलावर २५ फेब्रुवारी २०२२ रोजी सुनावणी होऊन विस्तार अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामसेवकाला सात दिव सांच्या आत विनामूल्य माहिती देण्याचे आदेश दिले होते.
- मात्र, ग्रामसेवकाने या आदेशाला केराची टोपली दाखवत माहिती दिली नाही.
- खंडपीठाची कारवाई
- वरिष्ठ स्तरावरून आदेश देऊनही माहिती मिळत नसल्या ने फारूक मुलानी यांनी राज्य माहिती आयुक्तांच्या खंडपी ठाकडे धाव घेतली.
- या प्रकरणावर दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी सुनाव णी झाली. त्यानंतरही माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने मुलानी यांनी पुन्हा पत्रव्यवहार केला. अखेर १४ मे २०२४ रोजी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने कठोर भूमिका घेतली.
- माहिती अधिकार कायद्याचा अवमान केल्याबद्दल आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तत्कालीन ग्रामसेवकाला १० हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश खंडपीठाने पारित केले.
- या आदेशाची प्रत ११ डिसेंबर २०२४ रोजी मुख्य कार्यका री अधिकारी (धाराशिव), गटविकास अधिकारी (परंडा) आणि अर्जदार यांना दि .11/12/2025 रोजि प्राप्त झाली आहे.

- त्या आदेशानुसार गट विकास अधिकारी परंडा पंचायत स मिती यांनी दिनांक १६/३/२०२६ नुसार आस्थापना विभा ग (२) दहा हजार रुपये वसूल करून घ्यावे व चलनाचे पावती या कार्यात सादर करावी असे पत्र काढले आहे.
- या कारवाईमुळे माहिती अधिकारात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, अर्जदाराने दिलेल्या कायदेशीर लढ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











