परंडा तालुक्यात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या धक्कादायक घटनांनी परिसरात उडाली खळबळ.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- परंडा तालुक्यात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या धक्कादायक घटनांनी परि सरात खळबळ उडाली आहे.
  • खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचे प्रय त्न केल्याच्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
  • पुतण्याच्या सतर्कतेमुळे चुलत्याचे प्राण वाचले परंडा शह रातील काशीद गल्ली येथील आकाश वसंत काशीद यांनी खाजगी सावकारांच्या सततच्या त्रासाला कंटाळून गळफा स घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
  • मात्र, वेळीच ही बाब त्यांच्या पुतण्याच्या लक्षात आली. पुतण्याने तत्काळ धाव घेत आकाश काशीद यांना खाली उतरवून त्यांचे प्राण वाचवले.
  • या प्रसंगामुळे कुटुंबीयांमध्ये मोठी घबराट पसरली असून, वेळेवर केलेल्या मदतीमुळे एक जीव वाचल्याने सर्वत्र दि लासा व्यक्त होत आहे.
  • व्याजाचा पैसा देऊनही जमीन परत न मिळाल्याने महिले चे विषप्राशन दरम्यान, कौडगाव येथील संध्याराणी सुधीर पाडूळे यांनीही खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी सावकाराकडून घेतलेले कर्ज व त्यावरील व्याजाची रक्कम पूर्णपणे फेडली होती. तरीदेखील संबंधित सावकार जमीन परत करण्यास टाळा टाळ करत असल्याने त्या मानसिक तणावाखाली होत्या.
  • अखेर नैराश्यातून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. प्रशा सनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह या दोन्ही घटनांमुळे परंडा तालुक्यात खाजगी सावकारांचा वाढता त्रास आणि त्यां च्यावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत अस ल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
  • स्थानिक नागरिकांनी तात्काळ कारवाई करून संबंधित सावकारांवर कडक गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
  • नागरिकांची मागणी खाजगी सावकारांवर त्वरित कठोर कारवाई करावी. पीडित कुटुंबांना आर्थिक व मानसिक मदत द्यावी.
  • अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोज ना कराव्यात दोन्ही ही उप जिल्हा रुग्णालय परंडा येथे उपचार चालू आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles