
जात पडताळणी धाराशिव कार्यालयाचा कारभार रामभरोसे; मोडक्या बाकड्या मुळे नागरिकांवर खाली बसण्याची वेळ.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- जिल्हा जात प्रमाणपत्र पड ताळणी समिती कार्यालयात शासकीय कामासाठी येणा ऱ्या नागरिकांना भीषण सोयीसुविधांच्या अभावाचा सामना करावा लागत आहे.
- कार्यालयात बसण्यासाठी असलेले टेबल आणि बाकडे मोडलेल्या अवस्थेत असल्याने, वृद्ध आणि महिलांसह अनेक नागरिकांना चक्क जमिनीवर बसण्याची वेळ आली आहे.

- काय आहे परिस्थिती….?
- जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्ह्यातील का नाकोपऱ्यातून नागरिक या कार्यालयात येतात. तासनता स रांगेत उभे राहावे लागणाऱ्या या नागरिकांसा ठी साध्या बसण्याचीही सोय नाही.
- कार्यालयातील फर्निचरची दुरवस्था झाली असून, अनेक बाकडी मोडलेली आहेत.
- यामुळे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आलेल्या विद्या र्थ्यांना आणि पालकांना कार्यालयाच्या व्हरांड्यात किंवा पायऱ्यांवर बसून प्रतीक्षा करावी लागत आहे.
- प्रशासनाचे दुर्लक्ष
- सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या कार्याल याकडे ‘बार्टी’ (BARTI) मार्फत निधी पुरवला जातो. मात्र, मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या या दुर्लक्षामुळे संताप व्यक्त होत आहे.

- “एकीकडे शासन डिजिटल इंडियाच्या बाता मारत आहे, तर दुसरीकडे जिल्हा स्तरावरील महत्त्वाच्या कार्यालयात नागरिकांना बसायला धड खुर्चीही नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











