धाराशिव जिल्हा परिषद सभापती निवडीत महायुतीचा झेंडा; चारही जागांवर वर्चस्व.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- ( धनंजय सांवत यां चे कार्यकर्ते नाराज नागरीकातून उलट सूलट चर्चेला उधा न ) धाराशिव जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदांची निवड प्रक्रिया आज उत्साहात पार पडली.
  • या निवडणुकीत महायुतीने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सि द्ध करत चारही सभापती पदांवर दणदणीत विजय मिळव ला आहे.
  • आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
  • नूतन सभापतींची नावे खालीलप्रमाणे:
  • १.अर्थ व बांधकाम सभापती: श्री. सिद्धेश्वर बळीराम कोरे (नांदगाव गट)
  • २.महिला व बालकल्याण सभापती: सौ. पूजाताई तुषार शिंदे (डिकसळ गट)
  • ३.कृषी व पशुसंवर्धन सभापती: श्री. भाऊसाहेब बाळासा हेब खडसरे (डोंजा गट)
  • ४.समाज कल्याण सभापती: श्री. विश्वास हनुमंत कोकणे (खामसवाडी गट)
  • विकासाच्या गतीला मिळणार बळ
  • जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.अर्चना राणाजगजितसिंह पा टील आणि उपाध्यक्षा सौ.उषाताई रवींद्र गायकवाड यां च्या सक्षम नेतृत्वाखाली आता नवीन सभापतींची टीम जि ल्ह्याच्या विकासासाठी सज्ज झाली आहे.
  • ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आ णि शेतीविषयक प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी हे नवीन पदाधिकारी गतीने काम करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
  • एकजुटीचा विजय
  • हा विजय महायुतीच्या भक्कम एकजुटीचा आणि जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा परिपाक असल्याचे बोलले जात आहे.
  • आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखा ली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणे ही सामूहिक ज बाबदारी असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी निवडीनंतर सांगितले.
  • या ऐतिहासिक विजयाबद्दल महायुतीचे सर्व नेते, पदाधि कारी आणि कार्यकर्त्यांनी नूतन सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles