
२ लाखांची लाच घेताना पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता व लिपिक जाळ्यात.
- प्रतिनिधी : नितीन राणे :- देयकातून कपात केलेली र क्कम परत मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रत्नागिरी पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंध क विभागाने रंगेहात पकडल्याची घटना उघडकीस आली आहे.
- या कारवाईमुळे सिंचन विभागात मोठी खळबळ उडाली आहे. गणेश हरीदास सलगर (वय ३६, कार्यकारी अभियं ता, वर्ग १) आणि शेखर चंद्रमणी पवार (वय ३१, कनिष्ठ लिपिक टंकलेखक, वर्ग ३) अशी अटक करण्यात आले ल्या आरोपींची नावे आहेत.

- तक्रारदार ‘शिवकृपा कन्स्ट्रक्शन’ या नावाने व्यवसाय करी त असून मंडणगड तालुक्यातील भोळवली येथील धरण गळती रोखण्यासाठी मातीकामाचे काम त्यांना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले होते.
- सदर काम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदारांना दोन देयके अदा करण्यात आली होती. मात्र तिसऱ्या आणि अंतिम देयका तून तब्बल ११ लाख ३० हजार ८९३ रुपयांची रक्कम कपात करण्यात आली.
- ही कपात केलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी तक्रार दाराने १८ मार्च २०२६ रोजी कार्यकारी अभियंता गणेश सलगर यांची भेट घेतली असता, त्यांनी ३ लाख ४० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
- याबाबत तक्रारदाराने २७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंध क विभाग, रत्नागिरी येथे लेखी तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी करताना एसीबी पथकाने सापळा रचला.
- यावेळी तडजोडीअंती दोन लाख रुपये स्वीकारण्याचे ठरले. मुख्य आरोपी सलगर यांनी ही रक्कम स्वतः न घेता कनिष्ठ लिपिक शेखर पवार याच्याकडे देण्यास सांगितले.
- या योजनाप्रमाणे तक्रारदाराने पवार याच्याकडे दोन लाख रुपयांची रक्कम दिल्यानंतर दबा धरून बसलेल्या ए.सी. बीच्या पथकाने तत्काळ कारवाई करत पवारला रंगेहात पकडले.
- त्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या कार्य कारी अभियंता सलगर यांनाही ताब्यात घेण्यात आले. दोघांनाही पुढील चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











