
राजापूरातील श्री मंदार जयंत दातार यांने डॉक्टरेट पदवी संपादन केल्याबद्दल ‘माय राजापूर’ ने केला सत्कार.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- तालुक्यातील दातार छापखा न्याचे मालक श्री जयंत दातार यांचा मुलगा श्री मंदार जयं त दातार यांने मुंबई ”हार्डवेअर फॉर हाय परर्फॉर्मन्स कॉ म्प्यूटिंग” या विषयात डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे.
- मंदार यांचे सहावी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा गुजराळी येथे झाले तर सहावी ते दहावी पर्यंत राजापूर हायस्कूल व अकरावी, बारावी रत्नागिरीतील गोगटे जोग ळेकर काॅलेज मध्ये झाले.

- त्यानंतर इलेक्ट्रॉनिक विषयात इंजिनिअर पदवी रत्नागिरी तील फिनोलेक्स काॅलेजमधून पूर्ण केली त्यानंतर आय. आय.टी मुंबई येथून एम टेक पदवी प्राप्त केली.
- याबद्दल ‘माय राजापूर’ चे जगदीशजी पवार व श्री संदीप जी देशपांडे यांनी मंदार दातार यांच्या निवासस्थानी जाऊ न शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
- तसेच त्यांच्या आई वडिलांचेही अभिनंदन करण्यात आले. त्याशिवाय ‘माय राजापूर’ चे संस्थापक श्री प्रदीप जी कोळेकर यांनीही मंदार दातार याला पुढील वाटचाली साठी दुरध्वनी वरुन शुभेच्छा दिल्या.
- मंदार दातार यांच्या सत्कार समारंभावेळी सौ.राधिका गुणे मॅडम, डॉक्टर सुयोगजी परांजपे उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











