
रिंगणेतील श्री.महालक्ष्मी मंदिरात ५४ व्या अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ.
- प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे रिं गणे गावातील नावेरी नदीच्या काठावर वसलेल्या श्री महा लक्ष्मी मंदिरात दि. २९ मार्च ते सोमवार ६ एप्रिल या का लावधीत प.पू गुरुवर्य वै.ह.भ.प. धोंडोपंत दादामहाराजां च्या कृपाशिर्वादाने संत सज्जनांच्या सान्निध्यात होणाऱ्या ५४ व्या. अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला आहे.
- कार्यक्रमाची सुरुवात दि. २९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० घटस्थापनेने करण्यात आली रविवार दि २९ मार्च ५ ते ६ ह.भ.प. श्री सखाराम महाराज आयरे (रिंगणे), दि. ३० ह.भ.प. दिगंबर महाराज हांदे (रिंगणे), दि. ३१ ह.भ. प. श्री संतोष महाराज हांदे (रिंगणे), दि.१ एप्रिल रोजी ह.भ.प. प्रभाकर महाराज कदम (कोंडगे), दि २ ह.भ.प. श्री विजय महाराज पांचाळ (रिंगणे),३ एप्रिल रोजी ह.भ. प. श्री दिगंबर महाराज हांदे (रिंगणे), दि. ४ ह.भ.प. श्री प्रभाकर महाराज कदम (कोंडगे), रविवार दि ५ रोजी वै.ह .भ.प.धोंडोपंत दादा महाराज (पंढरपूर) पुण्यतिथी गाथा वरील भजन, ह.भ.प. सखाराम महाराज आयरे यांचे प्रवचन होणार आहे.

- सोमवार दि ६ एप्रिल रोजी ह.भ.प. श्री बजरंगी महाराज करंजुले यांचें काल्याचे किर्तन होईल.
- तसेच रोज दि. २९ मार्च ते ६ एप्रिल पर्यंत दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत किर्तनकार ह.भ.प. श्री दिगंबर महाराज हांदे (रिंगणे),यांचे किर्तन,जागर भजन श्री हिरोजी स्मारक मंडळ (रिंगणे), ह.भ.प. राम महाराज शेळके (मुंबई) जाग र श्री दत्त प्रासादिक हांदे भजन मंडळ (रिंगणे) किर्तन ह. भ.प. श्री समीर महाराज सकपाळ (मुंबई), जागर शिवश क्ती भजन मंडळ (रिंगणे) किर्तन ह.भ.प. गोरखनाथ महा राज पिंजारी (सातारा) जागर श्री विश्वकर्मा उत्कर्ष भजन मंडळ (रिंगणे), किर्तन ह.भ.प. विजय महाराज पांचाळ (रिंगणे) जागर श्री काळंबादेवी भजन मंडळ (कोंडगे), कि र्तन प्रमोद महाराज राणे (चिपळूण) जागर श्री आदिष्टीदे वी भजन मंडळ (झर्ये), किर्तन ह.भ.प. संपतराव महाराज सकपाळ (महाबळेश्वर) जागर श्री हनुमान सेवा मंडळ (रिं गणे), किर्तन ह.भ.प. बजीरंग महाराज करंजुले (देवाची आळंदी) जागर श्री आसरादेवी भजन मंडळ (कुरंग), सोम वार दि.६ एप्रिल रोजी दिंडी मिरवणूक नंतर काल्याचा महाप्रसाद होणार आहे.
- सदर हरिनाम सप्ताहाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उप स्थित राहून किर्तन, प्रवचनाचा आस्वाद घ्यावा असे आवा हन मुख्य स्थानिक कार्यकारी मंडळ रिंगणे यांच्या वतीने अध्यक्ष श्री मनोहर रामचंद्र आयरे आणि सर्व मंडळ तसेच संस्थापक हिरोजी स्मारक मंडळ, पाटीलवाडी ह.भ.प. श्री सखाराम दा. आयरे, व्यवस्थापक श्री हिरोजी स्मारक युव क व महिला आणि श्री पाटीलवाडी युवक व महिला मंड ळ रिंगणे मुंबई यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











