परंडा तहसीलदारांना नागरिकांचा निर्वाणीचा इशारा; जन्म-मृत्यूच्या प्रलंबित फायली तातडीने निकाली काढण्याची मागणी.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातिल नागरिकानि तहसीलदार यांना दिले निवेदन या निवेदनात आसे म्हटले आहे की “आम्हाला वेळेवर जन्म प्रमाणपत्र मिळत नसेल, तर कार्यालयाचे उंबरठे झिजवून झिजवून शेवटी आमचे मृत्यू प्रमाणपत्रच प्रशासनाकडून दिले जा णार का?” असा संतप्त सवाल करत परंडा तालुक्यातील नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदन दिले.
  • गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या जन्म-मृत्यू नोंद आणि दुरुस्तीच्या फायली तात्काळ निकाली काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
  • परंडा तालुक्यातील शेकडो नागरिकांनी नाव बदल, जन्म तारीख दुरुस्ती आणि नवीन नोंदणीसाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह रीतसर अर्ज केले आहेत.
  • मात्र, दोन-दोन वर्षे उलटूनही या अर्जांवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. शैक्षणिक प्रवेश, शासकीय योज ना आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी ही प्रमाणपत्रे अत्यं त आवश्यक असताना, प्रशासकीय दिरंगाईमुळे नागरिकां ची मोठी अडचण होत आहे.
  • नागरिक आक्रमक; प्रशासनावर संताप वारंवार तहसील कार्यालयाचे फेरे मारूनही कर्मचाऱ्यांकडून समाधानकार क उत्तरे मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
  • “एका साध्या दुरुस्तीसाठी वर्षभर थांबणे ही शोकांतिका आहे. नागरिकांना होणारा हा मानसिक आणि शारीरिक त्रास थांबवावा,” अशी भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली.
  • निवेदनातील मुख्य मागण्या :
  • १. वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या सर्व फायलींची तात डीने तपासणी करून त्या मंजूर कराव्यात.
  • २. दुरुस्ती झालेली प्रमाणपत्रे अर्जदारांना विनाविलंब मि ळण्यासाठी प्रशासकीय आदेश द्यावेत.
  • ३. सामान्य नागरिकांना वारंवार हेलपाटे मारण्यास लाव णाऱ्या यंत्रणेत सुधारणा करावी.
  • प्रशासनाने यावर तातडीने पावले उचलली नाहीत, तर आ गामी काळात नागरिक अधिक आक्रमक पवित्रा घेतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
  • सर्व बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles