आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; पाचपिंपळा येथील १० MVA ट्रान्सफॉर्मरमुळे वीजप्रश्न मार्गी.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- पाचपींपळा परिसरातील अ नेक गावांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला वीजप्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार आहे.
  • माजी आरोग्यमंत्री तथा आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पाचपिंपळा येथील ३३ केव्ही सबस्टेशनवर अतिरिक्त १०MVA क्षमतेचा ट्रान्सफॉ र्मर बसविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
  • या निर्णयामुळे शेतकरी, व्यापारी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
  • वाढत्या मागणीला मिळणार बळ
  • गेल्या काही काळापासून पाचपिंपळा परिसरात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. अपुऱ्या क्षमतेमुळे या भागात वारंवार लोडशेडिंग, कमी व्होल्टेज (Low Vol tage) आणि तांत्रिक बिघाड यांसारख्या समस्या निर्माण होत होत्या.
  • याचा सर्वाधिक फटका शेतीपंपांना आणि स्थानिक उद्यो गांना बसत होता. नागरिकांनाही अंधाराचा सामना करावा लागत होता.
  • मात्र, आता नवीन १० MVA ट्रान्सफॉर्मरमुळे वीजपुरवठा अधिक सक्षम, स्थिर आणि सुरळीत होणार आहे.
  • शेतकऱ्यांनी मानले आभार
  • शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी वीज वितरण विभागाकडे सात त्याने पाठपुरावा केला होता.
  • त्यांच्या प्रयत्नांमुळे हा महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लागला आहे. यामुळे रब्बी हंगामासह इतर पिकांना पाणी देणे सुलभ होणार असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळणार आहे.
  • याबद्दल परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने डॉ. सावंत यांचे मनःपूर्वक आभार मानले जात आहेत.
  • विकासाला मिळणार गती
  • नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्यामुळे केवळ शेतीच नव्हे, तर ग्रामीण भागातील लघुउद्योगांनाही मोठी चालना मिळणार आहे.
  • अखंड वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे जीवनमान सुधारेल आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास नागरीकातून व्यक्त केला जात आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles