
ओणी वात्सल्य मंदिरचे संस्थापक डॉ महेंद्र मोहन गुजर यांना बॅ नाथ पै पुरस्कार जाहीर.
- प्रतिनिधी : ओणी : प्रमोद तरळ :- श्रीराम वाचन मंदिर व क्रिडा भुवन, सावंतवाडी आणि सावंतवाडी सहकारी प तपेढी मर्या.. सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.७ ते शनिवार ११ एप्रिल २०२६ या कालावधीत सायं ६ वा.श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे स्वातंत्र्य सैनिक कै.जयानंद मठकर व्याख्यानमाला २०२६ आयोजित करण्यात आली आहे.
- कै.जयानंद मठकर यांच्या दहाव्या स्मृतीदिनाच्या निमित्ता ने देण्यात येणारा यंदाचा कै.जयानंद मठकर स्मृती पुर स्कार वात्सल्य मंदिर ओणीचे संस्थापक डॉ महेंद्र मोहन गुजर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

- पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार दि. ७ एप्रिल रोजी सायं ६ वा. श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे सुप्रसिद्ध समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर यांच्या हस्ते डॉ महें द्र मोहन गुजर यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
- निस्वार्थी समाजसेवेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतू ने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे बॅ नाथ पै सेवांगण मालवण यांनी डॉ महेंद्र मोहन गुजर यांना पाठव लेल्या पत्रात म्हटले आहे.
- श्री.गुजर यांना बॅ.नाथ पै हा मानाचा पुरस्कार जाहीर झा ल्याबद्दल ओणी पंचक्रोशीसह राजापूर तालुक्यातून त्यां च्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











