
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत फेरबदल: धाराशिव जिल्हा संपर्क अध्यक्षपदी मनसे नेते राजेंद्र (बाबू) वागसकर यांची निवड करण्यात आली.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या संघटनात्मक रचनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
- मनसेचे खंदे नेते राजेंद्र (बाबू) वागसकर यांची धाराशिव जिल्हा संपर्क अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.
- राजेंद्र वागसकर यांच्याकडे असलेल्या प्रदीर्घ राजकीय अ नुभवाचा आणि पक्ष संघटनेवरील पकडीचा फायदा धारा शिव जिल्ह्यात मनसेला बळकट करण्यासाठी होणार आहे.

- वागसकर यांनी यापूर्वीही पक्षाने दिलेल्या विविध जबाब दाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
- आता धाराशिव जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आल्याने जिल्ह्यातील मनसैनिकांमध्ये उत्सा हाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव राजेंद्र (बाबू) वागसक र यांची निवड जाहीर होताच धाराशिव जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले आहे.
- “वागसकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्या त ‘राजगड’ अधिक मजबूत होईल आणि जनसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील,” असा विश्वास कार्यकर्त्यां नी व्यक्त केला आहे.
- या निवडीबद्दल मनसेच्या वतीने राजेंद्र (बाबू) वागसकर साहेबांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस आणि कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






