
पुण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले गट) ‘वर्किंग कमिटी’ बैठक संपन्न; आगामी रणनीतीवर चर्चा.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-पुणे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची महत्त्वाची ‘रिपब्लि कन वर्किंग कमिटी’ बैठक नुकतीच पुण्यात पार पडली.
- पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठव ले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.
- या बैठकीचे अध्यक्षपद पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर वदे यांनी भूषवले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आणि जनहिताचे मुद्दे यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

- यावेळी रिपब्लिकन वर्किंग कमिटीतील विविध वरिष्ठ प दाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- “पक्षाची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचव ण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करावे,” असे आवाहन यावेळी रामदास आठवले यांनी केले.
- प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी राज्यातील पक्ष विस्ता राचा आढावा सादर केला.
- या बैठकीमुळे पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील रिपब्लि कन कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून,आगामी काळात पक्ष आपली भूमिका अधिक आक्रमकपणे मांड णार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






