
तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांचे निधन.
- प्रतिनिधी : नितीन राणे :- तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्व दी साजरी करणार्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महारा ष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे.
- त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आ णखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली.
- आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गाय नातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई.

- ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्या आ शाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला.
- मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये 12,000 वर गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला.
- बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो.
- त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर…’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यां ना गाणं गायला लावले’, असे म्हणाल्याही होत्या.
- त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार ना ही, ही कल्पनाच करवत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांज ली अर्पण करतो.
- त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यां च्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






