नकली MLM औषधांचा वाढता धोका – एक वास्तव आणि जागरूकतेची गरज.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- जेव्हा माझ्या कुटुंबि याणी अचानक माझ्याकडे १०००० रुपये मेडीसीन खरेदी करण्यासाठी मागितले.
  • अर्थातच मला संशय आला की अशी कोणती महागडी औषधे आहेत जी माझ्याच घरी घेतली जातात आणि म ला माहीत नाही म्हणून मी डॉक्टरची Priscription माग वली आणि काय आश्चर्य ती Priscription नसून एका MLM कंपनी ने आयुर्वेदच्या नावाखाली विकेलेली नकली औषध होती.
  • आपली कोंकणी माणस कोणाच्याही प्रेमळ बोलण्याला स हज फसली जातात. MLM सारख्या स्कीमने कोकण वासीयांच मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
  • आधीच मध्यमवर्गीय राहणीमान. त्यात माहितीचा अभाव यामुळे या MLM सारख्या स्कीम राबविणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे.
  • सुरवातीला पैसे डबल करणाऱ्या नकली कंपनी आल्या आणि आता तर लोकांच्या आयुष्याजवळच खेळ मांडतात.
  • खर तर भारतामध्ये अशा प्रकारच्या योजना ‘The Prize Chits and Money Circulation Schemes (Ban ning) Act,1978’ अंतर्गत बेकायदेशीर ठरवल्या आहेत.
  • या ऑक्टोबरमध्ये बॅन केलेल्या आहेत. परंतु फसवणूक करणारे घटक खूप हुशार असतात. ते कायद्यांच्या पळवा टाचा मार्ग शोधतात.
  • या कायद्यामद्धे Money Circulation ला बंदी आहे ना मग ठीक आहे आम्ही वस्तु विकू. मग सुरू होते.
  • नविन फसवणुकीची पद्धत ,चैन बनवायची,एक लेफ्ट एक राइट साइड,वस्तु विकायची आणि कमिशन कमवायच.
  • या मध्ये हवी असतात माहितीचा अभाव असलेली कमी शिकलेली पण पैशांसाठी आस असेलेली मानवसोर्स जो आपल्या कोकणामध्ये भरभरून आहे.
  • त्यांना वस्तूंबरोबर स्वप्न विकली जातात, दाढी येण्याच्या अगोदर गाडीचे स्वप्न! पती बनण्याच्या अगोदर करोडपती चे स्वप्न. वस्तु विकायची आणि त्याबदल्यात कंपनीला मि ळतो एक फुकट सेल्समन, रिस्क फ्री वस्तूंची विक्री.
  • हो, कारण विकलेल्या वस्तूने कुणाच शारीरिक नुकसान झाल तर ते वैयक्तिक पातळीवर मिटविले जाते,आणि नु कसान भरपाई मागण्याचे शस्त्र आपले कोकणी माणूस केव्हा शिकलाच नाही ती सहनशील वृत्ती त्याला जन्म जात मिळालेली आहे आणि साखळी बनवणारे पण आप ल्याच आजूबाजूवाले, त्यांचे एवढ ब्रेनवॉश केल जात की आपण विकत असलेले प्रॉडक्ट औषध आहे की विष हे पण त्यांच्या ध्यानीमनी नसतं. तुम्ही बिझनेस करत आहात.
  • नोकरी तुमच्या वडिलांनी केली त्यांना ते (MLM मॉडेल) कळणार नाही.असे सांगून कुटुंबियापासून आपला मुलगा काय करतोय हे लपवून ठेवल जातं.
  • विशेष म्हणजे या मध्ये वयाची आणि शिक्षणाची देखील अट नाही. कुणीही जॉइन व्हा आणि माणसं जोडा आणि करोडपती बना. सुरवातीला 3-9-27-81-243-729-20 00-6500-19000-60000-……………116 cr -1046 cr ही गणितीय वाढ प्रत्यक्षात अशक्य आहे, कारण काही स्तरांनंतर नवीन सदस्य मिळणे जवळजवळ थांबते.
  • भारतात तेवढी लोक नाहीत. जे केव्हाच पोसीबल नाही एका विशिष्ट लेवल नंतर ते खूप अवघड बनत आणि मग तुमच्यातच दोष शोधले जातात .
  • तुमच्यात बिझनेस मॅनचे गुण नाही. तुला 4 मित्र जोडता येत नाहीत तुला विकता येत नाही.
  • मित्रहो वेळीच सावध व्हा तुमच्याकडे सेल्समनचे खरेच गुण असतील तर प्रोफेशनल मुलाखत देऊन चांगली कंपनी जॉइन करा.
  • तेथून श्रीमंतीकडे वळा फालतू वेळ आणि पैसा दिशाभूल करणाऱ्या योजनेला देऊ नका.  काही MLM कंपन्या चांगल्या देखील आहेत.
  • त्या आपल्या वस्तू विकण्यावर भर देतात , माणस जमा करायला सांगत नाहीत तेथे त्यांच्या जेवढ्या वस्तु विकाल तेवढच कमिशन तुम्हाला दिले जात.
  • तेथे करोडपतीची स्वप्न दाखविली जात नाही. त्यांच्या व स्तूला रीपीट वॅल्यू असते त्या अवास्तव महागड्या नसता त, आणि विशेष त्यांच्या वस्तू‌ स्टोर मध्ये देखील विक्रीस उपलब्ध असतात.
  • कृपया करून वेळीच जागे व्हा आणि आपल्या सोबत आ पल्या बांधवाना देखील जागे करा. जागरूकता हीच या फसवणुकीवरची सर्वात मोठी लस आहे.
  • अभिषेक हरिश्चंद्र मोरे (सामाजिक कार्यकर्ता) संपर्कc- ७५०६००६६७०
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles