
कोकण विभागातील पहिला आदर्श ‘जलतारा’ प्रकल्प साकडबावमध्ये साकारला…!
- प्रतिनीधी : शहापूर : हिराजी देसले :- शहापूर तालुक्या तील साकडबाव या गावाने जलसंधारणाच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
- ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ आणि ‘इनर व्हील क्लब ऑफ बॉ म्बे बायव्ह्यू’ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या १५० ‘जलतारा’ (भूजल पुनर्भरण) प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आज अत्यंत उत्साहात पार पडला.
- शास्त्रोक्त आणि तांत्रिक पद्धतीने पूर्ण झालेला हा कोकण विभागातील अशा प्रकारचा पहिलाच पथदर्शी प्रकल्प ठर ला आहे.

- भूगर्भातील ‘वॉटर बँक’
- शहापूरसारख्या पठारी भागात पाऊस भरपूर पडतो, परंतु भौगोलिक रचनेमुळे पाणी वाहून जाते. यावर उपाय म्हणू न गावात १५० विशेष पुनर्भरण खड्डे खोदण्यात आले आहेत.
- तांत्रिकदृष्ट्या डिझाइन केलेले हे खड्डे पावसाचे पाणी थेट जमिनीच्या खालच्या थरांपर्यंत(Aquifers) पोहोचवतात. यातून दरवर्षी सुमारे ५ कोटी लिटरहून अधिक पाणी जमिनीत जिरवले जाणार आहे.
- साकडबावची वार्षिक पाण्याची गरज १.६० कोटी लिटर असून, गरजेच्या चारपट पाणी जमिनीत साठवून हे गाव आता कायमचे ‘टँकरमुक्त’ होणार आहे.
- लोकसहभागातून यश
- या प्रकल्पासाठी मुख्य मार्गदर्शक व्यक्ती विकास केंद्र आ र्ट ऑफ लिव्हिंग चे श्री.गोमारे सर,लातूर, तसेच त्यांचे सह कारी श्री.सरवंदे सर आणी श्री.गर्डे सर यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले.
- विशेष म्हणजे, गावातील ५५ शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढे येत आपल्या जमिनीमध्ये हे खड्डे घेण्यासाठी जागा उपल ब्ध करून दिली.
- ज्यामुळे हा प्रकल्प यशस्वी झाला. स्थानिक समन्वयक रवींद्रजी हरड, विकासजी चौधरी, अरुणजी वाघ, गणेश जी गोरले आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग,शहापूर टीमने या साठी विशेष परिश्रम घेतले.
- दिनांक २५ एप्रिल रोजी लोकार्पण सोहळ्याला मुख्य देण गीदार सौ.कल्पना रमेश कानाकिया (स्व.रमेश कानाकिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ), इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ.का नन मेहता, देवकी शाह, किम, आर्ट ऑफ लिव्हिंगचे ज्येष्ठ मार्गदर्शक किशोरजी कुडव, योगशिक्षिका रेश्मा दीदी पर ब,आदर्श ग्रामसेवक भरत डिंगोरे, कृषी अधिकारी झुंजार राव साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते.
- अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड
- केवळ जमिनीची तहान भागवून न थांबता, ग्रामस्थांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘आनंदानुभूती’ (सुदर्शन क्रिया) योग शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
- शरीरासाठी पाणी आणि मनासाठी ध्यान असा दुहेरी बद ल गावात दिसून आला असून पहिल्या टप्प्यात १६ नाग रिकांनी तणावमुक्त जीवनाचा अनुभव घेतला आहे.
- पुढील पाऊल: विषमुक्त गाव
- या यशानंतर आता प्रत्येक घरात विषमुक्त भाजीपाल्यासा ठी ‘गंगा माँ मंडल’ (१ गुंठा शेती) आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.
- साकडबावचा हा जलतारा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक ‘दीपस्तंभ’ ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






