
परंडा नगरपरिषदेची मोठी कारवाई; कडक पोलीस बंदोबस्तात किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे भुईसपाट.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-किल्ला परिसरातील मुख्य रस्त्यावर झालेली अनधिकृत अतिक्रमणे परंडा नगर परिषदेने आज कडक पोलीस बंदोबस्तात मोहीम राबवून हटवली.
- या धडक कारवाईमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कोंडीत अडकलेला किल्ल्याचा रस्ता अखेर मोकळा झाला आहे.

- ऐतिहासिक परंडा किल्ल्याला भेट देण्यासाठी राज्यभरा तून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र, किल्ल्या कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक हातगाडे, पानटप ऱ्या आणि अनधिकृत विक्रेत्यांनी रस्ता व्यापला होता.
- या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होऊन पर्यटकांना चालणेही कठीण झाले होते. पर्यटकांच्या सुरक्षेचा आणि त्रासाचा विचार करून नगर परिषद प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला.
- आज सकाळी नगरपरिषदेच्या पथकाने पोलीस प्रशासना च्या मदतीने थेट घटनास्थळी धाव घेत कारवाई सुरू केली.
- अचानक झालेल्या या कारवाईमुळे अतिक्रमणधारकां म ध्ये एकच खळबळबळ उडाली.

- काही प्रमाणात वाद घालण्याचा प्रयत्न झाला, मात्र चोख पोलीस बंदोबस्तामुळे प्रशासनाने सर्व अतिक्रमणे हटवून रस्ता पूर्णपणे मोकळा केला.
- नगरपरिषदेच्या या धाडसी निर्णयाचे पर्यटक आणि स्थानि क नागरिकांमधून मोठे स्वागत होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






