
स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही रस्त्याची दुरवस्था रुग्णांची झोळी खांद्यावर घेऊन करावा लागतो खडतर प्रवास.
- प्रतिनीधी : संगमेश्वर : प्रमोद तरळ :-देश चालला डिजि टल क्रांतीकडे… आणि कोकणी माणूस आजही रुग्णाला वाहतोय खांद्याकडे.. अशी काहीशी अवस्था कोकणातील गाव वाडयांची आहे.
- देश स्वतंत्र झाला नेते आले गाड्या आल्या विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा झाल्या.
- पण रत्नागिरी जिल्ह्यातील आमच्या गावाला हक्काचा प क्का रस्ता देणारा कोणी ‘कैवारी’ अजून जन्माला आला नाही अशी व्यथा मौजे ओझरवाडी, तिवरे तर्फे देवळेतील ग्रामस्थ विलास रामाणे यांनी मांडली.

- माझे वडील श्री.रामचंद्र रामाणे सध्या गंभीर आजारी आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज आहे.
- पण आमच्या ओझरवाडीत जायला आणि तिथून बाहेर प डायला आजही गाडी जाईल असा पक्का रस्ता नाही. आ मच्या भावकीने रस्ता करण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा दिली.
- पण हा कच्च्या रस्ता होऊन आज तब्बल ८ वर्षे झाली, तरीही याचं डांबरीकरण झालेलं नाही.
- आज परिस्थिती अशी आहे की, माझ्या आजारी वडिलांना रुग्णालयात नेण्यासाठी आम्हाला त्यांना एका कपड्याच्या झोळीत (झोपाळ्यासारखं करून) टाकून, ५०० मीटरचा खडतर डोंगर-दऱ्यांचा रस्ता खांद्यावरून चालत पार करा वा लागत आहे.
- अशा बिकट परिस्थितीतून जर वाटेत काही अघटित घड लं तर याला जबाबदार कोण?
- ओझरवाडीतील ग्रामस्थ विलास रामचंद्र रामाणे यांनी मा यबाप शासन, खासदार, आमदार, जि.प.,पं समिती सदस्य यांना सवाल केला आहे की आम्ही फक्त निवडणुकीत मतदान करण्यापुरतेच नागरिक आहोत का..?
- आमच्या करामधून (Taxes) मोठा विकास होत असेल, तर तो आमच्या घरापर्यंत का पोहोचत नाही? दुनिया चंद्रा वर चालली आहे आणि आम्ही कोकणी माणूस आजही रुग्णाला खांद्यावर वाहून नेतोय हीच का आमची प्रगती?”

- शासन आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आमच्या ओझरवाडी या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करा वे आम्हाला दिलासा द्यावा अशी कळकळीची विनंती ओ झरवाडीचे त्रस्त ग्रामस्थ विलास रामाणे यांनी केली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






