
परंडा येथे बीट अंमलदार मुळे साहेब यांचा पी.एस.आय. पदी पदोन्नती बद्दल जाहीर सत्कार.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- परंडा पोलिस ठाण्याचे कर्त व्यदक्ष बीट अंमलदार मुळे साहेब यांची नुकती च पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदावर पदोन्नती झाली आहे.
- या पदाचा यशस्वी कार्यभार स्वीकारल्याबद्दल आज परंडा येथे त्यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार कर ण्यात आला.

- मुळे साहेब यांनी आपल्या सेवाकाळात अत्यंत कर्तव्यनि ष्ठेने आणि कार्यक्षमतेने काम करून नागरिकांमध्ये पोलि सांबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे.
- त्यांच्या याच उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना पी.एस .आय. पदावर बढती देण्यात आली आहे.
- या सत्कार सोहळ्याप्रसंगी आबासाहेब घोलप, कात्राबाद चे उपसरपंच गणेश कोकाटे, अर्जुन गवारे, आसु गावचे पो लिस पाटील महावीर इतापे यांच्यासह परिसरातील इतर अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- उपस्थित सर्व मान्यवरांनी मुळे साहेब यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले आणि त्यांच्या पुढी ल वाटचालीस व भावी कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
- सत्काराला उत्तर देताना मुळे साहेब यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि भविष्यातही जनसामान्यांच्या सेवे साठी व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध राह ण्याची ग्वाही दिली.
- या कार्यक्रमामुळे पोलिस आणि नागरिक यांच्यातील सलोख्याचे दर्शन पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






