राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी भोला बापूजी सैंदाणे यांची नियुक्ती.

  • प्रतिनिधी : हर्षल ठाकरे :- राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद चंद्र पवार पक्ष) च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी धुळे जि ल्ह्यातील युवा नेतृत्व तथा सामाजिक कार्यकर्ते भोला बा पूजी सैंदाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, राष्ट्रीय कार्याध्य क्षा तथा खासदार सुप्रिया ताई सुळे, विधिमंडळ गटनेते ज यंतराव पाटील, प्रदेश सरचिटणीस रोहित दादा पवार, प्रदे शाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती करण्यात आली असून, दि. ३० रोजी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
  • भोला सैंदाणे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आले ले युवा नेतृत्व असून गेल्या १५ वर्षांपासून ते राजकारण व सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत.
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांनी कायम एकनिष्ठ राहून का म केले आहे. सन २००९ मध्ये शाखाध्यक्ष पदापासून त्यां नी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली.
  • त्यानंतर विद्यार्थी, युवक आणि जिल्हा पातळीवरील विवि ध पदांवर काम करताना त्यांनी आपल्या नेतृत्वाची वेगळी छाप पाडली आहे.
  • जिल्ह्यातील विविध सामाजिक उपक्रम, शेतकरी प्रश्न, युव कांचे प्रश्न आणि जनसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासा ठी ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत.
  • त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर महा राष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.
  • नियुक्तीपत्र स्वीकारताना भोला सैंदाणे यांनी युवक प्रदेशा ध्यक्ष मेहबूब भाई शेख यांना विश्वास दिला की, पक्षाने आ णि वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास कधीही तडा जाऊ देणार नाही.
  • महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटन अधिक मजबू त करण्यासाठी, पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणे ज नसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
  • “दिलेल्या संधीचं सोनं करेल”
  • यावेळी बोलताना भोला सैंदाणे म्हणाले, “पक्षाने दिलेल्या संधीचं मी निश्चितच सोनं करेल. माझ्यावर वरिष्ठ नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन.
  • वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहीन.
  • महाराष्ट्रातील युवक संघटन अधिक मजबूत करण्यासाठी, जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.
  • पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी नेहमीच गोरगरीब, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार केला आहे. त्याच विचारधारेने पुढील काळात कार्य करत राहीन.”
  • नियुक्तीपत्र प्रदान प्रसंगी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील दादा गव्हाणे, युवक प्रदेश सचिव ॲड.अक्षय बेंद्रे, विद्यार्थी संघ टनेचे नेते कुंदन भैया, धुळे जिल्हाध्यक्ष डॉ.कुणाल पाटील, प्रदेश सचिव गोलू भैय्या राजपूत यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
  • भोला बापूजी सैंदाणे यांच्या निवडीमुळे धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्मा ण झाले असून, राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रां तून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles