गोरेगाव मधील महाराष्ट्र विद्यालयात अत्याधुनिक कलागृह सभागृह, कॉम्प्युटर लॅब, डिजिटल वर्गखोल्या व कौशल्य विकास उपक्रमाचे लोकार्पण

  • प्रतिनिधी : गोरेगाव : प्रमोद तरळ :- नूतन विद्यामंदिर संचालित महाराष्ट्र विद्यालय, गोरेगाव येथे खासदार निधी तून साकारलेल्या अत्याधुनिक कलागृह, कॉम्प्युटर लॅब, डिजिटल वर्गखोल्या तसेच शाळेच्या संपूर्ण इमारतीत बस विण्यात आलेल्या सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्थेचे भव्य उद्घा टन सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी माजी राज्यसभा खासदार सौ.प्रियांका चतुर्वेदी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
  • याचप्रसंगी महाराष्ट्र विद्यालयाच्या मराठी माध्यम प्राथमि क व माध्यमिक विभागाच्या शैक्षणिक वर्ष २०२६–२७ च्या विद्यार्थी दिनदर्शिकेचे (Student Calendar) प्रका शनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
  • यावेळी व्यासपीठावर नगरसेविका सौ. लक्ष्मी भाटिया-फा ळके, रोटरी क्लब ऑफ मुंबई गोरेगाव वेस्टच्या अध्यक्षा सौ.गौरी सावंत, रोटरी क्लबचे सचिव श्री.दर्शन शाह, उपा ध्यक्ष श्री.सखाराम गिराप, श्री.रवी सैनी (संचालक – Wit mans Industries Pvt. Ltd.), रोटेरियन श्री.अनिल सिंघी (संचालक – Addon Holding Pvt. Ltd.), श्री.र झवान नाईक (वेदांत फाउंडेशन), रोटेरियन श्री.राजेश अग्रवाल (Rotary Club of Bombay Airport) तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
  • यावेळी बोलताना सौ.प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितले की, “आज आपण केवळ दोन दालनांचे उद्घाटन करत नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची नवी दारे उघडत आहोत.”
  • त्यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मा. खासदार यांच्या निधीतून विद्यालयातील कलागृह सभागृ ह व कॉम्प्युटर लॅबचे नूतनीकरण करण्यात आले असून, कलागृह सभागृह विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपी ठ उपलब्ध करून देईल, तर अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅब विद्यार्थ्यांना डिजिटल युगाशी सक्षमपणे जोडेल.
  • कोडिंग, डिझाइनिंग, प्रेझेंटेशन यांसारख्या आधुनिक कौ शल्यांच्या माध्यमातून विद्यार्थी केवळ परीक्षांसाठी नव्हे, तर भविष्यातील स्पर्धात्मक जगासाठीही तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
  • शिक्षक मतदार संघ आमदार व कार्यकारिणी सदस्य, मार्ग दर्शक श्री.ज.मो.अभ्यंकर यांच्या आमदार निधीतून एक डिजिटल स्मार्ट संगणक देण्यात आला.
  • तसेच महाराष्ट्र विद्यालयाच्या मराठी माध्यम प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शैक्षणिक वर्ष २०२६–२७ च्या वि द्यार्थी दिनदर्शिकेचे प्रकाशनही सौ. प्रियांका चतुर्वेदी यां च्या हस्ते करण्यात आले.
  • याच कार्यक्रमात NSDC मान्यताप्राप्त वेदान्त व्होकेशन ल ट्रेनिंग प्रोग्रामचाही शुभारंभ करण्यात आला.
  • वेदान्त फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ मुंबई गोरेगाव वेस्ट आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट यांच्या संयुक्त स हकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यां ना CCTV, मोबाईल रिपेअरिंग, ब्युटी, आयटी आदी रोज गाराभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार आहे.
  • त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातात शैक्षणिक प्रमाणपत्राबरोबर च रोजगारक्षम कौशल्यही असेल, असे मत व्यक्त करण्या त आले.
  • सौ.प्रियांका चतुर्वेदी यांनी या उपक्रमासाठी सहकार्य कर णाऱ्या सर्व संस्था, देणगीदार, रोटरी क्लब, वेदान्त फाउंडे शन तसेच नूतन विद्यामंदिर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
  • विशेषतः समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ मुंबई गोरेगाव वेस्टच्या अध्य क्षा सौ.गौरी सावंत यांच्या कार्याचाही गौरव करण्यात आला.
  • या कार्यक्रमास शिवसेना ऊ.बा.ठा पक्षाच्या माजी राज्यस भा खासदार सौ.प्रियांका चतुर्वेदी, नगरसेविका सौ. लक्ष्मी भाटिया-फाळके, दैनिक वृत्त दिनांकचे संचालक, पत्रकार श्री.अमित जोशी, कोकण कट्टा संस्थेचे संस्थापक श्री.अ जित पितळे,अध्यक्ष विवेक वैद्य, रोटरी क्लब ऑफ मुंबई गोरेगाव वेस्टच्या अध्यक्षा सौ.गौरी सावंत, रोटरी क्लबचे सचिव श्री.दर्शन शाह, उपाध्यक्ष श्री. सखाराम गिराप, श्री. रवी सैनी, रोटेरियन श्री.अनिल सिंघी, श्री.रझवान नाईक, रोटेरियन श्री.राजेश अग्रवाल तसेच रोटरी क्लबचे पदाधि कारी, वेदान्त फाउंडेशनचे प्रतिनिधी, नूतन विद्यामंदिर संस्थेचे पदाधिकारी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नूतन विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री.संदीप सावंत, सचिव श्री.अनिल देसा ई, संचालक श्री.शंकर पटनाईक, श्री.संजय काळभोर, श्री. महेश करमरकर, व्यवस्थापन समिती सदस्या सौ. प्रतिभा तरपटला, संस्थेचे सल्लागार श्री.मुरलीधर मोरे, एन.व्ही.ए म.’स महाराष्ट्र इंग्लिश Schoolच्या प्राचार्या सौ.पूर्वा नाई क, महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विष्णू मसुरक र, तसेच दोन्ही शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्म चाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
  • विविध मान्यवर, देणगीदार संस्था आणि सामाजिक संघट नांमध्ये प्रभावी समन्वय साधून हा कार्यक्रम यशस्वी कर ण्यासाठी संस्थेचे सचिव श्री.अनिल देसाई यांनी महत्त्वपू र्ण भूमिका बजावली, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक कर ण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles