
ओझरे गावातील अर्धवट रस्त्यामुळे नागरिकांचे हाल विद्यार्थी, रुग्ण आणि ग्रामस्थ संकटात.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- संगमेश्वर तालुक्यातील ओझ रे गावातील अर्धवट रस्त्याच्या कामामुळे ग्रामस्थांचे जन जीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे रस्त्याची अव स्था अत्यंत दयनीय झाली असून ठिकठिकाणी खड्डे,चिख ल आणि पाण्याचे साचलेले डबके निर्माण झाले आहेत.
- त्यामुळे वाहनांची वाहतूक धोकादायक बनली असून नाग रिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
- या रस्त्यावरून साखरपा येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या शा ळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- वाहतुकीतील अडथळ्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसा न होत असून कामानिमित्त बाहेर जाणारे नागरिक, शेतक री आणि व्यावसायिकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
- ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याची अवस्था इतकी गंभी र झाली आहे की आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दल किंवा इतर अत्यावश्यक सेवा वेळेत गावा त पोहोचणेही कठीण झाले आहे.
- भविष्यात एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची जबाब दारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उप स्थित केला आहे.
- या गंभीर समस्येची छायाचित्रे व व्हिडिओ मराठी वृत्तवा हिन्या आणि वृत्तपत्रांकडे पाठविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
- शासन व संबंधित प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन अर्धवट रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अ शी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
- रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून सुरक्षित व सुरळीत वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्राम स्थांनी दिला आहे.

- या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबा बदारी संबंधित यंत्रणा व प्रशासनाची राहील, असेही ग्राम स्थांनी स्पष्ट केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






