चार महिन्याचे मानधन रखडले; घरकुल कर्मचाऱ्याचे धाराशिवमध्ये धरणे आंदोलन; तोडगा न निघाल्यास १३ जुलैपासून ‘लेखणी बंद’चा इशारा.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- घरकूल कर्मचारया चे गेल्या चार महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने आर्थि क अडचणीत सापडलेल्या जिल्ह्यातील घरकुल विभागा तील कर्मचान्यांनी मंगळवारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्र णा (डीआरडीए) कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
  • 10 जुलैपर्यंत थकीत मानधन खात्यावर जमा न झाल्यास 13 जुलैपासून जिल्हाभर ‘लेखणी बंद’ आंदोलन करण्या चा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
  • धाराशिव जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये कार्यरत घरकुल विभागातील कर्मचारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि जिल्हा प्रोग्रामर मांचे मार्च 2026 ते जून 2026 या काला वधीतील चार महिन्यांचे मानधन अद्याप अदा झालेले नाही.
  • बारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी न लागल्याने कर्म चाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून त्यांनी आंदो लनाचा मार्ग स्वीकारला.
  • आंदोलनादरम्यान सीएससी (CSC) कंपनीचे प्रतिनिधी श्री.आव्हाड यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली.
  • त्यांनी येत्या 10 जुलैपर्यंत मार्च आणि एप्रिल या दोन म हिन्यांचे मानधन संबंधित कर्मचाव्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
  • मात्र, आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्य क्त केला. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा
  • परिषद धाराशिव तथा अध्यक्ष, कार्यकारी समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना निवेदन देण्यात आले आहे.
  • निवेदनात थकीत मानधन तातडीने अदा करण्याची माग णी करण्यात आली असून,अन्यथा 13 जुलैपासून जिल्ह्या तील सर्व घरकुल कर्मचारी ‘लेखणी बंद’ आंदोलन सुरू करतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
  • धाराशिव पंचायत समितीचे कर्मचारी व डेटा एन्ट्री ऑपरेट र इम्रानखान पटेल यांनी सांगितले की, गेल्या चार महिन्यां पासून मानधन मिळाले नसल्याने कर्मचान्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे.
  • कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्ष ण, घरखर्च आणि इतर दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे.10 जुलैपर्यंत मानधन जमा न झाल्यास 13 जुलैपासून जिल्हाभर लेख णी बंद आंदोलन करण्यात येईल.
  • आंदोलनात जिल्हा प्रोग्रामर मेघराज पवार यांच्यासह महे श मगर, सुरज मुळे,अभिमन्यू हवालदार, गुस्साज पांचाळ, मंगेश गावस्कर, प्रदीप शेटे, पंकज सूर्यवंशी, स्वराज्य पाटी ल, मयूर गुळमि तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील घर कुल विभागाचे डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि कर्मचारी मो ठ्या संख्येने सहभागी झाले होते.
  • कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ऐन पावसाळा आणि सणासु दीच्या काळात चार महिन्यांचे मानधन थकीत राहिल्याने अनेकांवर कर्ज काढण्याची वेळ आली आहे.
  • वेळेत मानधन न मिळाल्यास घरकुल योजनांशी संबंधित कामकाजावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्या त येत आहे.
  • दरम्यान,सीएससी कंपनीने दिलेल्या आश्वासनानंतर आता 10 जुलैपर्यंत प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे घर कुल कर्मचान्यांसह जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.
  • मागण्या मान्य न झाल्यास 13 जुलैपासून होणाऱ्या ‘लेख णी बंद’ आंदोलनामुळे घरकुल योजनांशी संबंधित प्रशास कीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles