भूम तालुक्यात भेसळयुक्त दूध कारवाईचा धसका; पात्रात संशयास्पद पावडर फेकल्याने पाण्याचा रंग काळसर, परिसरात दुर्गंधी.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-राज्यभरात सध्या भे सळयुक्त दुधाविरुद्ध प्रशासनाने सुरू केलेल्या धडक कार वाईचा धसका दूध माफिया घेतला असल्याचे चित्र आहे.
  • भूम तालुक्यातील एका दूध पात्रात (ओढ्यात/पाण्यात) अज्ञात इसमांनी मोठी संशयास्पद पावडर फेकून दिल्या ची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
  • या पावडरमुळे पात्रातील पाण्याचा रंग चक्क काळसर झा ला असून, संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी सुटली आहे.
  • या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून,नागरिकां मधून या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लाग ली आहे.
  • कारवाईच्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न…?सध्या राज्यभरात अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पोलीस प्रशासनाकडून दूध भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई ची मोहीम राबवली जात आहे.
  • अनेक ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त दूध आणि त्यासा ठी वापरले जाणारे केमिकल्स, पावडर जप्त केली जात आहे.
  • याच कारवाईच्या भीतीने भूम तालुक्यातील दूध माफियां नी आपल्याकडील भेसळीचे साहित्य आणि संशयास्पद पावडर पकडले जाण्याच्या भीतीने रात्रीच्या वेळी पाण्या च्या पात्रात फेकून नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
  • पाण्याचा रंग बदलला, दुर्गंधीने नागरिक त्रस्तस्थानिक ना गरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील संबंधित पाण्याच्या पात्रात अचानक मोठ्या प्रमाणात पांढरी आणि रासायनिक पावडर तरंगताना दिसली.
  • काही वेळातच या पावडरमुळे पाण्याचा रंग बदलून तो का ळसर झाला.तसेच या रसायनांमुळे परिसरात अत्यंत उग्र आणि जीवघेणी दुर्गंधी पसरली आहे.
  • या दूषित पाण्यामुळे परिसरातील जनावरांच्या आरोग्याला तसेच भूगर्भातील पाण्याच्या सुयोग्यतेला मोठा धोका नि र्माण झाला आहे.
  • प्रशासकीय चौकशीची मागणीहा प्रकार उघडकीस आ ल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
  • मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या आणि पर्यावरणाची हानी करणाऱ्या या दूध माफियांचा शोध घेणे गरजेचे आहे.
  • अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी या घट स्थळाची तात्काळ पाहणी करून, पाण्याचे नमुने प्रयोगशा ळेत तपासावेत आणि यामागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारा ला बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles