महावितरणला निवेदन; सायंकाळचे लोडशेडिंग दिवसा करा भोगा नागरीकांची मागणी.

  • प्रतिनीधी : परंडा : फारुख शेख :- भोत्रा (ता.परंडा,जि. धाराशिव) येथील ग्रामस्थांनी गावात सायंकाळी होणारे भारनियमन (लोडशेडिंग) तात्काळ बंद करून ते दिवसा करण्यात यावे, या मागणीसाठी महावितरणच्या उपकार्य कारी अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे.
  • सध्या गावात दररोज सायंकाळी ६:४५ ते रात्री ९:३० या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे ग्रा मस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.
  • ग्रामस्थांनी सांगितले की, सायंकाळची वेळ ही विद्यार्थ्यां च्या अभ्यासासाठी, नागरिकांच्या दैनंदिन कामकाजासा ठी, दुकाने व व्यावसायिक आस्थापनांच्या व्यवहारासाठी तसेच घरगुती कामांसाठी अत्यंत महत्त्वाची असते.
  • अशा वेळी वीजपुरवठा बंद होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तयारीवर परिणाम होत असून पिण्याच्या पाण्या च्या मोटारी, घरगुती उपकरणे, लहान उद्योग-व्यवसाय आ णि इतर आवश्यक कामेही ठप्प होत आहेत.
  • यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
  • निवेदनात महावितरण प्रशासनाने सायंकाळी होणारे ६: ४५ ते ९:३० या वेळेतील भारनियमन रद्द करून ते दिवसा योग्य वेळेत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
  • यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास अबाधित राहील, नागरिकांची दैनंदिन कामे सुरळीत होतील आणि गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
  • महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून भोत्रा गावातील सायंकाळ चे लोडशेडिंग तात्काळ दिवसा करण्याबाबत आवश्यक आदेश द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
  • या निवेदनावर धनंजय गोफणे,संतोष गोफणे, लिंबराज गो फणे, सुनील सल्ले, समाधान कोकाटे, कुलदीप देशमुख, अजित शिंदे, करणसिंग कंचे, अशोक सल्ले आणि सुजित मोहिते यांच्यासह भोत्रा गावातील समस्त ग्रामस्थांच्या स्वा क्षऱ्या आहेत.
  • गावाच्या हितासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी महा वितरणने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपे क्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles