
माळशिरस बार असोसिएशनकडून दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध; दोषींवर कारवाईची मागणी.
- प्रतिनिधी : माळशिरस : योगेश सुळे :- दिल्ली येथील जंतर-मंतरवर शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या वि द्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या घटनेचा माळ शिरस बार असोसिएशनने तीव्र निषेध केला आहे.
- या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी माग णी तहसीलदार, माळशिरस यांच्यामार्फत शासनाकडे करण्यात आली.

- बार असोसिएशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,दि ल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी शांततेच्या मार्गाने उपोष ण आंदोलन करत असताना २० जुलै २०२६ रोजी पोलि सांनी त्यांच्यावर अमानुष लाठीमार केला.
- ही घटना लोकशाही मूल्यांना व मानवी हक्कांना काळिमा फासणारी असून तिचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आ ला आहे.
- या प्रकरणी दिल्लीचे पोलिस आयुक्त यांना तात्काळ नि लंबित करण्यात यावे तसेच घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
- हे निवेदन माळशिरस बार असोसिएशनच्या वतीने तह सीलदार, माळशिरस यांना गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी सादर करण्यात आले.
- माळशिरस तहसीलदार यांना निवेदन देताना माळशिरस बार असोसिएशन चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






