गौरी-गणपती सणासाठी पुणे–कल्याण मार्गे रत्नागिरी विशेष गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी.

  • प्रतिनीधी : प्रमोद तरळ :-गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभू मीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन गाडी क्र. 01447/01448 पुणे–रत्नागिरी –पुणे ही विशेष गाडी कायमस्वरूपी नियमित करण्यात यावी त सेच सध्याच्या गाडीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी माग णी रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था, कल्याण – सावंतवाडी (रजि)यांच्या वतीने करण्यात आली आहे.
  • संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष श्री. सुनील सिताराम उतेकर यांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना निवेदन देऊन ही माग णी केली.
  • दिवा, कसारा, कर्जत, नवी मुंबई, पुणे, भिवंडी, कल्याण तसेच परिसरातील मोठ्या संख्येने कोकण प्रवासी वास्त व्यास आहेत.
  • या प्रवाशांना गौरी-गणपती तसेच वर्षभर कोकणात जा ण्यासाठी थेट आणि सोयीची रेल्वे सेवा उपलब्ध झाल्यास त्यांचा प्रवास अधिक सुखकर होईल.
  • पुणे–कल्याण मार्गे रत्नागिरीपर्यंत ही गाडी कायमस्वरू पी सुरू केल्यास कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
  • तसेच रेल्वेला अधिक प्रवासी मिळाल्याने रेल्वेच्या उत्पन्ना तही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांची गरज लक्षात घेऊन गाडी क्र. 01447/01448 ला मुदतवाढ देऊन ती कायमस्वरूपी नियमित करण्यात यावी, अशी संस्थेची ठाम मागणी आहे.
  • या मागणीसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील सिताराम उते कर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे प्रमुख सदस्य श्री. यशवंत परब, सौ.सुरेखा दिविळकर, श्रीमती दिपाली आमडोसक र, सौ.सुनीता खेताडे, सौ.नंदा महाने, श्री.अनिल गायकवा ड, श्री.भीमया कुमारी, श्री.अनिल सरदार, श्री.निशांत कांबळे आदी प्रयत्नशील आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles