
परंडा तालुक्यात जलसंधारण कामांतील कथित भ्रष्टाचार विरोधात रंगनाथ ओव्हाळ यांचे आमरण उपोषण….! कामे न करताच लाखो रुपयांची बिले उचलल्याचा आरोप; निष्पक्ष चौकशी समिती नेमण्याची मागणी.
- प्रतिनिधी : परंडा : :- येथील उपविभागीय जलसंधारण कार्यालयामार्फत परंडा तालुक्यात झालेल्या जलसंधारण कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जा ची कामे झाल्याचा आरोप करत, सामाजिक कार्यकर्ते रं गनाथ भीमराव ओव्हाळ यांनी आज, शुक्रवार दि. १४ ऑ गस्ट रोजी जलसंधारण कार्यालयासमोर आमरण उपोष णाला सुरुवात केली आहे.
- वारंवार लेखी तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतली गेल्यामुळे त्यांनी अखेर उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

- याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, वर्ष २० २४ मध्ये जलसंधारण कार्यालयांतर्गत परंडा तालुक्यातील सुमारे ३० ठिकाणी विविध बंधाऱ्यांची कामे मंजूर करण्या त आली होती.
- मात्र, यातील अनेक कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची आणि अर्धवट स्थितीत असल्याचा आरोप ओव्हाळ यांनी केला आहे.
- धक्कादायक बाब म्हणजे, काही ठिकाणी प्रत्यक्षात कोण तेही काम न करता केवळ कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे दाखवून शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीची उघड लूट करण्यात आली आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
- या कथित घोटाळ्याबाबत रंगनाथ ओव्हाळ यांनी यापूर्वी संबंधित विभागाकडे पुराव्यांसह लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या.
- परंतु, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल न घेता दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याने परिस रात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
- अखेर प्रशासनाला जागे करण्यासाठी त्यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.”दोषींवर कारवाई होई पर्यंत मागे हटणार नाही””शासनाच्या पैशांची उघडपणे लूट सुरू आहे.
- जोपर्यंत या संपूर्ण ३० कामांची सखोल चौकशी करण्या साठी वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष चौकशी समिती नेमली जात नाही आणि दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कडक कायदेशीर कारवाई होत नाही.
- तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही,” असा ठाम निर्धार रंगनाथ ओव्हाळ यांनी उपोषणस्थळी बोलताना व्यक्त केला.
- या उपोषणामुळे परंडा तालुक्यातील जलसंधारण विभागा चा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, प्रशा सन आता यावर काय पाऊल उचलणार आणि दोषींवर कारवाई करणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लाग ले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






