मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व डॉ शैलेश शारदा नीळकंठ मोहिते यांचा गौरव.

  • प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- एक सामान्य कुटुंबातू न आलेले डॉ.शैलेश शारदा नीलकंठ मोहिते यांनी आप ल्या असामान्य कर्तुत्वाने वैद्यकीय क्षेत्रातील एका मोठ्या पदापर्यंत झेप घेतली आहे.
  • मुंबईच्या चाळ संस्कृतीमधून पुढे आलेला एक मुलगा या घडीला मुंबई पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालय विभागाचे संचालक म्हणून काम पाहत आहे.
  • ही बाब प्रचंड लक्षणीय आहे आणि म्हणूनच जीवनात का हीतरी करण्यासाठी धडपणाऱ्या प्रत्येक युवकाने त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा, असे गौरद्वार मुंबई म राठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी काढले निमित्त होते.
  • डॉ.मोहिते यांच्या सत्कार समारंभाचे लांजा, राजापूर- संग मेश्वर तालुका उत्कर्ष मंडळातर्फे डॉ. शैलेश मोहिते यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
  • यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या जेष्ठ उपाध्यक्षा स्वा ती घोसाळकर मंडळाचे सरचिटणीस श्री.मधुकर पवार मंडळाचे तसेच नायर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर, अधि कारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • गेल्या ३६ वर्षाहून अधिक काळ फॉरेन्सिक मेडिसिन वि भागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मोहिते यांनी कूपर आणि नायर हॉस्पिटल च्या डिन पदाची जबाबदारी सांभाळली आहे.
  • वैद्यकीय क्षेत्रात डॉ. मोहिते हे त्यांच्या कडक शिस्तीसाठी, पारदर्शक प्रशासनासाठी आणि कामातील चोखपणासा ठी ओळखले जातात.
  • मात्र प्रशासकीय कामात कडक असले तरी निवासी डॉक्ट रांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी ते नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभे राहतात.
  • त्यामुळे विद्यार्थी आणि डॉक्टरांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहेत,असा उल्लेख चव्हाण यांनी आपल्या मनोगतात मांडला.
  • सत्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करत असताना डॉ. मोहिते यांनी शाळेतील एका मुलाच्या धडपडण्याची गोष्ट सांगितली.
  • “मला डॉक्टर व्हायचे होते हे मी आधीपासून ठरवले होते पण फॉरेन्सिक सारख्या किचकट विभागात जाऊन कार किर्दी घडवण्याचा निर्णय झाला तो अवांतर वाचनामुळे, पोलिसांच्या दक्षता मासिकाचे नियमित वाचन केल्यामुळे मला नवीन दिशा मिळाली.
  • मृत्यूनंतरचे शरीर विच्छेदन योग्य झाल्यास तपासाला गती आणि पुढे न्याय मिळू शकतो. त्यामुळे मी या क्षेत्रात कार कीर्द घडविण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फायदा न्या यासाठी अंकात करणाऱ्या लोकांना मिळून दिला.
  • महापालिकेच्या सेवेत काम करत असताना मला असंख्य डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी यांचे सहकार्य मिळा ल्यामुळे या क्षेत्रात मी पुढे जाऊ शकलो”.
  • ‌यावेळी डॉ.मोहिते यांनी लांजा, राजापूर- संगमेश्वर तालु का उत्कर्ष मंडळ आणि त्या मंडळाचे सरचिटणीस श्री म धुकर पवार यांच्या गेल्या चार दशकातील कोकणच्या उपे क्षित भागांमधील शैक्षणिक कार्याचे विशेष कौतुक केले.
  • या कार्यक्रम प्रसंगी डॉ.राहुल चकोर, डॉ.अलका शुभ्रमण्य म, श्रीमती शुभांगी बापट, श्रीमती रीना भाताडे, डॉ.उन्नती देसाई, डॉ.केतकी उल्पात डॉ.राकेश भदाडे,श्री प्रशांत सा ळुंके,डॉ.ज्योती मोहिते, श्रीमती रोहिणी जंगम, श्री.हरीश रावत, शंकर सुर्वे, अजित कदम, संजय केणेकर, श्रीमती अनिता तालेवार, श्रीमती शुभांगी वेंगुर्लेकर, श्रीमती तृप्ती मुंबरकर,अंकिता परब,डॉ.हेतल शहा, श्रीमती नेहा धुरी, श्री.विद्याधर सुर्वे, श्री.तुलसीदास रावले आदी मान्यवर उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles