
दापोली तालुक्यातील सहकार क्षेत्रात मोठी कारवाई! पतसंस्थेच्या १३ पदाधिकारी-अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल.
- प्रतिनिधी : नितीन राणे :- दापोली तालुक्यातील सहका र क्षेत्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे.
- एका जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या पतसंस्थेच्या तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक आणि कर्ज अ धिकारी अशा एकूण १३ जणांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- लेखापरीक्षकांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई कर ण्यात आल्याचे समोर आले आहे.

- त्यामुळे संबंधित पतसं स्थेतील आर्थिक व्यवहार आणि कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकर णाची दापोली तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
- १३ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा
- मिळालेल्या माहितीनुसार, पतसंस्थेच्या तत्कालीन अध्य क्ष, उपाध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक आणि कर्ज अधिका ऱ्यांसह १३ जणांविरोधात लेखापरीक्षणादरम्यान निदर्श नास आलेल्या बाबींवरून तक्रार करण्यात आली.
- या तक्रारीच्या आधारे दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
- या प्रकरणामुळे संबंधित पतसंस्थेच्या कारभाराबाबत विविध प्रश्न उपस्थित झाले असून, पोलिस तपासातून नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे.
- सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण
- पतसंस्था या सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक व्यवहारा शी जोडलेल्या असल्याने अशा प्रकारच्या कारवाईकडे गां भीर्याने पाहिले जात आहे.
- लेखापरीक्षणातील तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने दापोलीच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
- दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याने संबंधित व्यक्तींवरील आ रोप सिद्ध झाले आहेत असे समजता येत नाहीत. पोलिस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच अंतिम सत्य स्पष्ट होणार आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






