
मा.आमदार तानाजीराव सावंत यांच्या आदेशाने आंधोरी कुंभेफळ आणि साकत येथे गाव भेट दौरा संपन्न; अर्चना अन्ना जाधव सभापती जि.प.सदस्य राहूल डोके पंचायत सामिति सदस्य तानाजि कोलते यांनी केले दौरे.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- परंडा शिवसेना नेते आणि माजी मंत्री मा.तानाजीराव सावंत यांच्या आदेशानुसार,परं डा तालुक्यातील आनाळा जिल्हा परिषद गटांतर्गत येणा ऱ्या आंधोरी, कुंभेफळ आणि साकत या गावांमध्ये भव्य ‘गाव भेट’ दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
- दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी संपन्न झालेल्या या दौ ऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींसमोर आपल्या अने क प्रलंबित समस्यांचा पाढा वाचला.

- ग्रामसेवकाच्या कारभारावर नागरिकांची तीव्र नाराजीया गाव भेट दौऱ्यात अर्चना अण्णा जाधव (सभापती), राहुल डोके (जिल्हा परिषद सदस्य), तानाजी कोलते (पंचायत समिती सदस्य) आणि दिनकर खैरे या लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.
- यावेळी गावकऱ्यांनी जि प्र शाळे पूडे प्युअर ब्लॉक बसक ने, शिपाई ची पेमेट, रोजगार शेवक पेमेट, वीज, पाणी,गटा री, घरकुल बिल, शौचालय बिल, गायगोठा आणि विहीर अशा मूलभूत सुविधांविषयी तक्रारी मांडल्या.
- विशेषतः “ग्रामसेवक गावामध्ये वेळेवर येत नाहीत आणि संपर्क साधला असता फोनही उचलत नाहीत,” अशी गंभी र तक्रार नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे केली.
- कामचुकारपणा खपवून घेणार नाही: राहुल डोके यांची तं बीनागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हा परिष द सदस्य राहुल डोके यांनी उपस्थित ग्रामसेवकांना कडक शब्दांत फटकारले.
- “पाण्याची टाकी तातडीने धुवून स्वच्छ करावी आणि पा ण्याचे निकामी झालेले वाल्व तातडीने बदलून घ्यावेत.
- शासकीय कामात असा निष्काळजीपणा आणि कामचु कारपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही,” अशी कडक तंबी त्यांनी ग्रामसेवकांना दिली.
- कंडारी रस्त्यावरील पुलाच्या दुरुस्तीसाठी निवेदनयावेळी कंडारी रस्त्यावरील पुलाची नळी फुटल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे गावकऱ्यांनी लोकप्रति निधींच्या निदर्शनास आणून दिले.
- हा पूल तातडीने दुरुस्त करून मिळावा, यासाठी ग्रामस्थां च्या वतीने लोकप्रतिनिधींना एक लेखी निवेदनही देण्यात आले.
- या दौऱ्याप्रसंगी दत्तू शंकर मेंडे, रफीक शेख, सचिन राऊ त, विनोद नायकोडे, गणेश नायकोडे, गौश पठाण, राजू बें ग रामदास मेंडे ज्ञानेश्वर कोठुळे, सागर कुलकर्णी, आसिफ शेख, यांच्यासह कुंभेफळ गावातील असंख्य नागरिक आ णि लहान-मोठे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






