
श्री क्षेत्र टेरव येथे ११ ऑक्टोबरपासून भव्य नवरात्रोत्सव…! कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई मातेच्या मंदिरात धार्मिक विधींसह नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी.
- प्रतिनीधी : चिपळूण : प्रमोद तरळ :- दसपटी विभागा तील श्री क्षेत्र टेरव येथील भाविक व पर्यटकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुलस्वामिनी श्री.भवानी वाघजाई मंदिरात सा लाबादप्रमाणे यंदाही आदिशक्ती जगद्जननी श्री भवानी वाघजाई मातेचा भव्य नवरात्रोत्सव धार्मिक विधी, पूजन व पारंपरिक रूढी-परंपरेनुसार उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
- रविवार, दि. ११ ऑक्टोबर ते सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नवरात्रोत्सवाचे विविध धार्मिक का र्यक्रम होणार असून, उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरा त आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट तसेच पालखीची विशेष सजावट करण्यात येणार आहे.

- नवरात्रोत्सवादरम्यान श्री.भवानी, वाघजाई, महालक्ष्मी,का लकाई व कुलस्वामिनी देवींच्या मूर्तींना वारानुसार नवरंगां च्या साड्या परिधान करून सोन्या-चांदीच्या मौल्यवान अ लंकारांनी सालंकृत करण्यात येणार आहे.
- त्यामुळे नवरात्रोत्सवात मंदिरातील देवींचे मनोहारी रूप भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
- श्री क्षेत्र टेरव येथील मंदिरात ७.५ फूट उंचीची अत्यंत सुंद र व अप्रतिम कृष्णशिळेतील श्री भवानी मातेची मूर्ती असू न, त्यासोबत गणपती, वाघजाई, भूमिगत कालकाई, महा लक्ष्मी, कुलस्वामिनी, महादेवाची पिंडी, भैरी, केदार तसेच नवदुर्गांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे.
- मंदिराचे विशेष आकर्षण म्हणजे श्री भवानी मातेबरोबरच शैलपुत्री, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्या यनी, काल रात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री या नवदुर्गांच्या मूर्ती सवि स्तर माहितीसह स्थापित करण्यात आल्या आहेत.
- भैरी-भवानी आणि नवदुर्गा यांचे एकत्रित दर्शन घडणारे हे देवस्थान महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण देवस्थानांपैकी एक असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
- कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण दाक्षिणात्य वास्तुशैलीत उभार लेले हे मंदिर सध्या भाविकांसह पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
- नागमोडी वळणाचा रस्ता, वनश्रीने नटलेले विस्तीर्ण पठा र, भव्य गोपुरे, आकर्षक देवतामूर्ती, मनमोहक उद्यान तसेच देवराईतील हिरवीगार वनराई आणि आल्हाददायक गारवा यामुळे श्री क्षेत्र टेरवला भेट देणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या वाढत आहे.
- निसर्गसौंदर्याने नटलेले हे देवस्थान धार्मिक व आध्यात्मि क केंद्राबरोबरच पर्यटनस्थळ म्हणूनही विकसित होत आहे.
- जागृत देवस्थान, नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हा केला धावून जाणारी, संकटविमोचक देवी म्हणून श्री भवानी वाघजाई मातेची ख्याती आहे.
- महाराष्ट्र शासनाने या स्थळाला यात्रास्थळाचा व पर्यटना चा ‘क’ दर्जा तसेच तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा प्रदान केला आहे.
- श्री.क्षेत्र टेरव येथील श्री भवानी-वाघजाई मातेच्या दर्शना सोबतच भाविक व पर्यटकांना चिपळूण येथील विंध्यवा सिनी मंदिर, परशुराम मंदिर, दसपटीची रामवरदायिनी,तुरं बव येथील शारदादेवी मंदिर तसेच मार्लेश्वर मंदिर आदी धार्मिक स्थळांनाही भेट देता येणार आहे.
- नवरात्रोत्सवाच्या कालावधीत मंदिर भाविकांच्या दर्शना साठी खुले राहणार असून ओटीचे साहित्य मंदिरात उपल ब्ध करून देण्यात येणार आहे.
- महाराष्ट्रासह विविध भागांतून येणाऱ्या भाविकांनी श्री भवानी वाघजाई मातेच्या दर्शनाचा आणि नवरात्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ, श्री क्षेत्र टेरव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






