
वाटूळ मधील श्री गांगो आकारी मंदिराचा परिसर दिवाबत्तीनी उजळला.
- प्रतिनीधी : वाटूळ : प्रमोद तरळ :- राजापूर तालुक्याती ल मौजे वाटूळ गावातील जागृत देवस्थान श्री गांगो आका री मंदिरात देणगीदारांनी दिलेल्या निधीतून दिवाबत्तीची सोय करण्यात आल्याने संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे.
- या मंदिरात स्ट्रीट लाईट लावण्यासाठी ग्रामस्थ कैं तातोबा वासुदेव चव्हाण यांच्या स्मरणार्थ गं.भा. सुहासिनी वासुदे व चव्हाण यांनी १०,०००/- रु तसेच कै. दामोदर नाईक यांच्या स्मरणार्थ श्रीमती वंदना नाईक यांनी ८०००/- रु एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे.

- संपूर्ण मंदिरात पाच स्ट्रीट लाईट बसविण्यात आल्याने मंदिर आणि बाहेरील परिसर उजळून निघाला आहे.
- मंदिर परिसरात दिवाबत्तीची निकड लक्षात घेऊन निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल ग्रामस्थ तसेच भक्तांनी देण गीदारांचे आभार मानले आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






