जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची रा.गे.शिंदे महाविद्यालयास सदिच्छा भेट.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार हे परंडा येथे आयोजि त महसूल दिनाच्या कार्यक्रमासाठी आले असता शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली.
  • महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांनी त्यांना म हाविद्यालयास भेट देण्याचे निमंत्रण दिले होते. हे निमंत्रण स्वीकारून जिल्हाधिकारी पुजार यांनी सायंकाळी महावि द्यालयास भेट दिली.
  • यावेळी जिल्हाधिकारी पुजार यांनी महाविद्यालयातील वि विध विभागांना भेट देऊन महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याची माहिती जाणून घेतली.
  • धाराशिव जिल्ह्यातील उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून रा.गे. शिंदे महाविद्यालयाचे कार्य उल्लेखनीय असून, परंडा हे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील तालुका असतानाही ग्रा मीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षणाची उत्त म सुविधा या महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
  • महाविद्यालयाचे प्रशस्त व सुंदर प्रांगण, विविध शैक्षणिक अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने उप लब्ध करून दिलेल्या शैक्षणिक सुविधांचे त्यांनी कौतुक केले.
  • अकरावी-बारावीपासून पदवी, पदव्युत्तर स्तरावरील कला, वाणिज्य व विज्ञान शाखा, संशोधन केंद्र, पत्रकारिता आदी विविध अभ्यासक्रम महाविद्यालयात उपलब्ध असल्याबद्द ल त्यांनी समाधान व्यक्त केले.
  • महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै. रा. गे. शिंदे गुरुजी यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करताना जिल्हाधिकारी पुजार यां नी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला.
  • तसेच संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी महाविद्याल याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचेही त्यांनी कौतुक केले.
  • “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहा त आणण्यासाठी अशा प्रकारची महाविद्यालये प्रत्येक ठि काणी असणे गरजेचे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
  • यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांनी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव तसेच शिक्ष ण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय, परंडा यांच्या व तीने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा शाल, पुष्प गुच्छ व महाविद्यालयाच्या इतिहासावर आधारित माजी प्राचार्य डॉ.दीपा सावळे लिखित पुस्तक भेट देऊन सत्कार केला.
  • याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव व म हाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ भागातील प्राध्यापक सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles