गायरान जमिनीच्या मागणीसाठीचे उपोषण मागे; लेखी आश्वासनानंतर तिसऱ्या दिवशी रावसाहेब चव्हाण यांचे उपोषण स्थगित.

  • प्रतिनीधी : परंडा : फारूक शेख :- गायरान जमिनीवरी ल अतिक्रमण नियमित करून सातबाऱ्यावर नोंद घ्यावी, या मागणीसाठी परंडा तहसील कार्यालयासमोर सुरू अस लेले रावसाहेब चव्हाण यांचे उपोषण अखेर तिसऱ्या दिव शी मागे घेण्यात आले.
  • माजी आमदार राहुल मोटे यांनी फोनवरून मध्यस्थी केली , तर राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांनी पुढाकार घेतला.
  • महसूल प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर च व्हाण यांनी आपले उपोषण स्थगित केले. रावसाहेब चव्हा ण यांनी १ सप्टेंबरपासून परंडा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.
  • गेल्या २० वर्षांपासून या प्रश्नासाठी पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
  • डोमेगाव येथील गट क्रमांक ११६ मधील ५ एकर गायरान जमिनीवर सन १९७८ पासून अतिक्रमण असल्याचे चव्हा ण यांनी सांगितले.
  • या जमिनीची ते वहिवाट करीत होते. मात्र, सीना-कोळगा व धरणाच्या निर्मितीनंतर ही जमीन पाण्याखाली गेल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला.
  • त्यामुळे सदर गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करून सातबाऱ्यावर नोंद द्यावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
  • उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी माजी आमदार राहुल मोटे यांनी तहसीलदार व उपोषणकर्ते चव्हाण यांच्याशी फोन वर चर्चा करून मध्यस्थी केली.
  • तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा ध्यक्ष राहुल बनसोडे यांनी प्रशासनाशी समन्वय साधत उपोषण सोडविण्यासाठी पुढाकार घेतला.
  • अखेर प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर राव साहेब चव्हाण यांनी उपोषण मागे घेतले.
  • यावेळी मजहर दहेलूस, घनश्याम शिंदे, तात्यासाहेब लांड गे, शिवाजी गायकवाड, सहायक महसूल अधिकारी बी. ए स. मठपती, महसूल सहायक पवन लांडगे, पोलीस हवाल दार नितीन गुंडाळे, पोलीस हवालदार रमेश क्षीरसागर आ दी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles