गणेशोत्सवापूर्वी अहेरीतील रस्ते खड्डेमुक्त करा…!

  • प्रतिनीधी : अहेरी : स्वरूप गावडे :-गणेशोत्सवाच्या पा र्श्वभूमीवर अहेरी शहर व परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, गणपती आगमनापूर्वी सर्व प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून ते खड्डेमुक्त करावेत, अशी ठाम मागणी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.
  • यासंदर्भात युवासेना अहेरी विधानसभा संपर्क प्रमुख सचि न येरोजवार यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभा गाचे उपविभागीय अभियंता,अहेरी यांना निवेदन देण्यात आले असून, निवेदनाची प्रत नगरपंचायत कार्यालय,अहेरी यांनाही देण्यात आली आहे.
  • सततच्या पावसामुळे अहेरी शहर व परिसरातील अनेक प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
  • ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा ला गत आहे.
  • दुचाकीस्वारांसाठी हे खड्डे अधिक धोकादायक ठरत असू न, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचा ऱ्यांनाही दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
  • गणेशोत्सव हा नागरिकांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा मो ठा सण असल्याने आगामी काळात अहेरी शहरात नाग रिक व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढणार आहे.
  • गणपती आगमन, स्थापना, पूजा-अर्चा तसेच विविध धा र्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे रस्त्यांवरील वाहतू क वाढणार असल्याने खराब रस्ते व खड्ड्यांमुळे अपघा ताची शक्यता अधिक गंभीर बनली आहे.
  • विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाचे पाणी खड्ड्यां मध्ये साचल्यानंतर रस्त्याची वास्तविक स्थिती लक्षात येत नाही.
  • त्यामुळे दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांना अपघाता चा मोठा धोका निर्माण झाला आहे.
  • एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपा ययोजना करणे आवश्यक असल्याची भूमिका शिवसेना कार्यकर्त्यांनी मांडली.
  • निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारि त येणाऱ्या अहेरी शहर व परिसरातील सर्व प्रमुख रस्त्यां ची तातडीने पाहणी करून गणपती आगमनापूर्वी दर्जेदार पद्धतीने खड्डे बुजवून आवश्यक ती दुरुस्ती पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
  • नागरिकांच्या जीवित आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर कोण त्याही प्रकारचे दुर्लक्ष होऊ नये तसेच केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कामाला त्वरित सुरुवात करावी, अशीही मागणी करण्यात आली.
  • यावेळी युवासेना अहेरी विधानसभा संपर्क प्रमुख सचिन येरोजवार यांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा अहेरीकरां च्या श्रद्धेचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे.
  • मात्र रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये.
  • गणपती आगमनापूर्वी संबंधित विभागांनी तातडीने रस्त्यां ची दुरुस्ती करून अहेरीकरांना सुरक्षित आणि सुकर प्रवा साची सुविधा उपलब्ध करून द्यावी.”
  • निवेदनावेळी शिवसेना अहेरी शहर प्रमुख विनेश तोटावा र, शहर संघटक आयुष मामीडवार, सोशल मीडिया प्रमुख अंकुश मंडलवार, रोहित सडमेक, गोलू संगुवार तसेच शि वसेनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles