वाशी येथे प्रेमा गोपालन कंपनीची वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- महिलांच्या नेतृत्वातू न शेती, दुग्ध व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमा तून आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या प्रेमा गोपा लन महिला फार्मर प्रोड्यूसर कंपनीची वार्षिक सर्वसाधा रण सभा वाशी येथे दि.०३ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
  • सभेस ७६७ महिला सभासदांसह कंपनीचे संचालक मंड ळ उपस्थित होते.
  • कंपनीने अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती साधली असून सध्या कंपनीची ३ कोटी ५८ लाख रुपयांची उलाढाल आहे.
  • कंपनी कळंब वाशी भुम व परंडा या चार तालुक्यात कार्य करत असुन कंपनीचे सुमारे १५०० महिला सभासद आहेत.
  • महिलांना विविध व्यवसायांसाठी आर्थिक सहाय्य देण्या बरोबरच विनाव्याजी कर्जाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले जात आहे.
  • सभेच्या प्रारंभी कंपनीच्या डायरेक्टर सीमा सय्यद यांनी कंपनीच्या स्थापनेमागील उद्देश, आतापर्यंतची वाटचाल, कंपनीला मिळालेले पुरस्कार, सध्याची उलाढाल, निव्वळ नफा तसेच महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
  • यामुळे कंपनीच्या कार्याची आणि भविष्यातील उद्दिष्टांची सभासद महिलांना स्पष्ट माहिती मिळाली.
  • कंपनीच्या माध्यमातून डेअरी व्यवसाय, दूध संकलन व प्र क्रिया, मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थ, महिला शेतकरी प्रशि क्षण तसेच प्रोड्यूसर ग्रुपच्या व्यवसायासाठी आर्थिक स हाय्य अशा विविध उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे.
  • यावेळी स्वयं शिक्षण प्रयोगच्या देवकन्या जगदाळे यांनी संस्थेचे कार्य व कार्यक्षेत्र याबाबत माहिती देत महिलांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढणे गरजेचे असल्याचे सांगितले.
  • महिलांनी आत्मविश्वासाने निर्णय घेऊन नेतृत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
  • शिंदे सर यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने च्या माध्यमातून महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचे आवाहन केले.
  • जिंतपुरे सर यांनी आत्मा गट जोडणीचे फायदे सांगत सें द्रिय शेतीचे महत्त्व स्पष्ट केले.
  • शिनगारे सर व गुमटे सर यांनी कार्बन क्रेडिट प्रकल्पाची माहिती देत फळबाग लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यां ना आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.
  • सहाय्यक कृषी अधिकारी यादव मॅडम यांनी कृषी विभागा च्या विविध योजनांची माहिती दिली.
  • तसेच पल्लवी माने व शुभांगी कुलकर्णी यांनी कंपनीच्या आगामी नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दिपाली जाधव यांनी केले, तर आभार प्रिया राखुंडे यांनी मानले.
  • कंपनीच्या सर्व संचालक व वाशी तालुका समन्वयक जय श्री काळे राजेश शिंगारे व सर्व लीडर यांच्या नियोजनातून सभा यशस्वीपणे पार पडली.
  • महिलांच्या नेतृत्वातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देत प्रे मा गोपालन महिला फार्मर प्रोड्यूसर कंपनीची सुरू अस लेली वाटचाल महिला सक्षमीकरणाचा आदर्श निर्माण करणारी ठरत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles