
वीज ग्राहकांना न्याय द्या; बिलिंगच्या घोळाविरोधात शिंदेसेनेचा एल्गार
- प्रतिनीधी : अहेरी : स्वरूप गावडे :-अहेरी गाव व परि सरातील अनेक वीज ग्राहकांचे मागील सुमारे पाच महि न्यांपासून नियमित मीटर रीडिंग घेण्यात आले नसून, अने क ग्राहकांना वेळेवर वीज बिलेही उपलब्ध करून देण्यात आली नाहीत.
- आता मागील अनेक महिन्यांची रक्कम एकत्रित करून ग्राहकांना अचानक मोठ्या रकमेची वीज बिले देण्यात ये त असून, त्यावर व्याज, डीपीसी व विलंब शुल्क आकार ण्यात येत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

- या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी अधिका री व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी तसेच सामान्य वीज ग्राहकांना न्याय द्यावा, या मागणीसाठी शिवसेना अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (MSEDCL) आलाप ल्ली येथील उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
- यावेळी युवासेना अहेरी विधानसभा प्रमुख सचिन येरोज वार, तालुका प्रमुख अक्षय करपे, अंकुश मंडलवार ,शोश ल मिडीया प्रमुख प्रकाश गद्दलवार विधानसभा मदत कक्ष प्रमुख मयूर त्रिनगरीवारतालुका सचिव साईनाथ औतकर अहेरी शहर प्रमुख
- विनेश तोटावार अहेरी संघटक आयुष मामीडवार प्रज्वल रापर्तीवार सोनू संगुवार रोहित सडमेक कुणाल वर्धलवार तसेच शिवसेना व युवासेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- निवेदनात म्हटले आहे की, मागील अनेक महिन्यांपासून नियमित मीटर रीडिंग व बिलिंग न झाल्यामुळे ग्राहकांना दरमहा त्यांच्या प्रत्यक्ष वीज वापराची व देय रकमेची माहि ती मिळाली नाही.
- आता अचानक अनेक महिन्यांचे एकत्रित मोठे बिल देण्या त येत असल्याने सामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडत आहे.
- मीटर रीडिंग व बिलिंग प्रक्रियेत वितरण कंपनीच्या स्तराव र झालेल्या त्रुटी, विलंब किंवा निष्काळजीपणाचा आर्थि क भार सामान्य ग्राहकांवर टाकण्यात येऊ नये, अशी ठाम मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
- अहेरी गाव व परिसरातील मागील पाच महिन्यांच्या मीटर रीडिंगचा संपूर्ण रेकॉर्ड तपासावा, प्रत्येक ग्राहकाचे प्रत्यक्ष मीटर रीडिंग व बिलांची पडताळणी करावी आणि ज्या ग्रा हकांचे रीडिंग घेण्यात आले नाही, त्याची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.
- तसेच MSEDCLच्या विलंबामुळे किंवा निष्काळजीपणा मुळे ग्राहकांवर एकत्रित थकबाकीचा भार पडला असल्या स, त्यावर आकारण्यात आलेले अन्यायकारक व्याज, डी पीसी व विलंब शुल्क रद्द करून सुधारित बिले देण्यात यावीत, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.

- याप्रकरणी संबंधित मीटर रीडर, कंत्राटदार, कर्मचारी व पर्यवेक्षक अधिकाऱ्यांची चौकशी करून कर्तव्यात कसूर अथवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर नियमा नुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
- सदर तक्रारीची तात्काळ दखल घेऊन ग्राहकांना न्याय न दिल्यास लवकरच शिवसेने कडून वीज ग्राहकांना घेऊन मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असा तंबी वजा इशारा ही देण्यात आला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






