“हायवेवर मारहाण करून लुटणारी कुख्यात टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली गजाआड..”

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :-धाराशिव जिल्ह्याती ल मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढुन चो रीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत मा.पोलीस अधीक्षक श्रीमती. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री.सचिन पांडकर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो लीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचे आदेशावरुन सपो नि श्री.अमोल मोरे, पोहेकों / राहुल नाईकवाडी, पोहेकों/बळीराम शिंदे, पोहेकों/अमोल चव्हाण, चालकपोकों/ के दार शेरखाने, विनायक दहीहंडे, प्रकाश बाईनवाड, व QRT स्टाफसह शासकीय वाहनाने रवाना होऊन यांचे पथक मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढात पेट्रोलिंग करत असताना दि. 06.09.2026 रोजी पथकास गोपनीय बातीमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक आयशर टेम्पो मध्ये दरोड्याचे साहित्य घेवून दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे.
  • अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर वाहन हे सोनेगा व कडे जाणारे रोडवर असता पहाटे 05:50 वाजता एक आयशर भरधाव वेगाने आला.
  • त्याला उभा राहण्याचा इशारा केला असता आयशर चाल काने नमुद आयशर हा पोलीस पथकास जिवे ठार मार ण्याचे उद्देशाने अंगावर घातला असता ते बाजूला झाल्या ने थोडक्यात बचावले.
  • त्यानंतर सदरआयशर पुडे निघुन गेला. त्यावर पथकाने न मुद आयशर टेम्पोचा पाठलाग करुन त्यातील इसमास ता ब्यात घेवून अंबेजवळगा शिवारातील स्थानिक लोकांच्या मदतीने इसमांना ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव-1) आनंद उर्फ आकाश शामराव पवार, वय 27 वर्षे, रा.आळणी ता.जि.धाराशिव 2) बल्या उर्फ सोनु अशोक शिंदे, वय 23 वर्षे, रा. गोलेगाव ता.भुम जि.धाराशिव, 3) शंकर गणा काळे, वय 24 वर्षे, रा. जय भवानी नगर ढोकी ता.जि.धाराशिव,असे सागिंतले.
  • तसेच इतर तीन पळून गेले. पथकाने त्यांचे ताब्यातून एक इटकरी रंगाचा आयशर टेम्पो क्र एमएच 24 बीडब्ल्यु 9506 असे एकुण 17,00,050₹ असा मुद्देमाल जप्त केला.
  • तसेच पोलीस पथकाने नमुद आरोपी यांचे कडे अधिक चौकशी केली असता त्यांना सागिंतले की, पोलीस ठाणे ढोकी, धाराशिव ग्रामीण, शिराढोण, नळदुर्ग हद्दीमधील सोलारचे केबल ही आम्ही चोरी केली असल्याचे सागिंतले.
  • त्यानी यापुर्वी नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीत मध्ये रोडवरुन जाणारे नागरिक यांचे कडून जबरीने लुटलेला माल सदर इरटीगा कार व सोन्याचे दागिने मुद्देमाल असा एकुण 24, 08,050 त्यांच्या ताब्यातून हस्तगत करुन नमुद तीन आ रोपीस मालासह धाराशिव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले.
  • ही उल्लेखनीय कारवाई श्रीमती रितु खोखर, पोलीस अधी क्षक, धाराशिव व श्री. सचिन पांडकर, अपर पोलीस अधी क्षक, धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री विनोद । इज्ज्पवार, सपोनि श्री. अमोल मोरे, पोहेकों / राहुल नाईकवाडी, पोहेकॉ बळीराम शिंदे, पोहेकों/अमोल चव्हाण, चालकपोकों/ केदार शेरखाने, विनायक दहीहंडे, प्रकाश बाईनवाड, व QRT पथक यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles