लाटीपाडा धरणाचे पाणी ओव्हरफ्लो, तरी १६ गावांतील शेतकरी तहानलेले….!

  • प्रतिनीधी : साक्री : हर्षल ठाकरे :- पांझरा नदीचे पाणी लाटीपाडा धरणातून ओव्हरफ्लो होत असताना धरणाच्या उजव्या कॅनॉलमधून नियोजनपूर्वक पाणी सोडल्यास का टवान भागातील १६ गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
  • सध्या या भागातील शेतकरी दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जात असून शेतीपिकांना पाण्याची नितांत गरज आहे.
  • मात्र, शेतकऱ्यांना पाणी देण्याऐवजी पाटबंधारे विभागाक डून ‘कर्मचारी नाहीत’ असे कारण पुढे केले जात असल्या ने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
  • महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.युवराज काकूंस्ते यांनी पाटबंधारे विभागा शी संपर्क साधून लाटीपाडा धरणातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून उजव्या कॅनॉलमधून काटवान भा गातील शेतकऱ्यांना पाणी देण्याची मागणी केली.
  • मात्र,विभागाकडून कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कारण सां गण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.
  • विशेष म्हणजे, ‘कर्मचारी नसतील तर पाटचारीवर माणसे आम्ही स्वखर्चाने लावून देतो’, असेही संघटनेच्या वतीने विभागाला सांगण्यात आले.
  • तरी देखील पाटबंधारे विभागाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
  • धरणात पाणी, मग शेतकरी पाण्यापासून वंचित का?
  • एकीकडे धरणाचे पाणी ओव्हरफ्लो होऊन वाहून जात आहे, तर दुसरीकडे काटवान भागातील शेतकरी पाण्या साठी धडपडत आहेत.
  • उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून शेतकऱ्यांना दिला सा देण्याऐवजी केवळ कर्मचारी नसल्याचे कारण देणे म्ह णजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
  • देशीरवाडे गावाजवळील काम बंद करून पाणी आणण्या त आले असले तरी पुढील नियोजन आणि वितरणाची जबाबदारी असलेल्या विभागाकडूनच उदासीनता दाख वली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
  • विटाई गावापर्यंत पाणी पोहोचवण्याची मागणी
  • लाटीपाडा धरणाच्या उजव्या कॅनॉलमधून सोडण्यात येणा रे पाणी केवळ काही गावांपुरते मर्यादित न ठेवता मिठाई गावापर्यंत पोहोचले पाहिजे, अशी सर्व शेतकऱ्यांची ठाम अपेक्षा आहे.
  • योग्य नियोजन केल्यास या भागातील अनेक गावांतील शेतीला या पाण्याचा फायदा होऊ शकतो.
  • यासाठी धनराज गांगुर्डे, भूषण गांगुर्डे, अमोल ठाकरे (प्रता पपूर), पराग कुवर (छाईल), राजू अहिरराव, डॉ . शिवाजी भामरे,मयूर अहिरराव (दिघावे), संतोष भामरे (नाडसे), ॲ ड. युवराज तोरवणे, शहाजी तोरवणे (बेहेड), संदीप भामरे (दारखेल) यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाने तातडीने पाण्याचे नियोजन करून मिठाई गावा पर्यंत पाणी पोहोचवावे, अशी मागणी केली आहे.
  • नियोजन झाले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
  • पाटबंधारे विभागाने तातडीने उजव्या कॅनॉलमधून पाणी सोडण्याचे नियोजन करून काटवान भागातील शेतकऱ्यां ना दिलासा द्यावा.
  • अन्यथा पाटबंधारे विभागाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात प्रा.युवराज काकूंस्ते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा महारा ष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे युवक तालुका ध्यक्ष श्री.हर्षल ठाकरे यांनी दिला आहे.
  • तसेच प्रा.युवराज काकूंस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आम दार मंजुळाताई गावित तसेच पालकमंत्री जयकुमार राव ल यांना निवेदन देऊन या गंभीर प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचेही श्री.हर्षल ठाकरे यांनी सांगितले.
  • धरणाचे पाणी वाहून जाणार आणि शेतकरी पाण्याविना कोरडाच राहणार, ही परिस्थिती पाटबंधारे विभागाच्या नि योजनशून्य कारभाराचे उदाहरण ठरत आहे.
  • आता तरी विभागाने जागे होऊन तातडीने पाण्याचे नियो जन करावे आणि हे पाणी मिठाई गावापर्यंत पोहोचवावे, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles