मॉडर्न हायस्कुलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा; AI च्या युगातही शिक्षकांची भूमिका महत्त्वाची – शिक्षणतज्ज्ञ नरेंद्र नायडू

  • प्रतिनीधी : शिवाजी अंबिके :- मॉडर्न हायस्कुलमध्ये यं दाचा शिक्षक दिन अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वाता वरणात साजरा करण्यात आला.
  • या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ नरेंद्र नायडू उपस्थित होते.
  • “आजच्या तंत्रज्ञानाच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगातही शिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.
  • तंत्रज्ञान व विज्ञानाने दिलेले शोध उत्तम आहेत, पण त्याचा योग्य वापर केला पाहिजे,” असे प्रतिपादन नरेंद्र नायडू यां नी आपल्या भाषणात केले.
  • पुढे बोलताना नायडू यांनी विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे विचार मांडले. “मुलांनी मोबाईलचा अति वापर टाळावा.
  • आजच्या काळात कुटुंबात एकमेकांना वेळ देणे आणि म नमोकळ्या गप्पा होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना निसर्गा च्या जवळ नेले पाहिजे, जेणेकरून त्यांचे व्यक्तिमत्त्व समृ द्ध होईल.
  • शिक्षक-विद्यार्थी नाते अधिक एकसंध राहणे काळाची गर ज आहे,” असे ते म्हणाले.
  • तसेच, “शिक्षक जे सांगतात आ णि बोलतात, त्याचे प्रति बिंब त्यांच्या स्वतःच्या वर्तणुकीत दिसले पाहिजे, कारण मुले नेहमी शिक्षकांचेच अनुकरण करत असतात,” या शब्दांत त्यांनी शिक्षकांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली.
  • कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना सोनोने यांनी प्रास्ताविक केले.
  • त्यानंतर प्रा. मानसिंग साळुंके तसेच सतीश लिंबेकर यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर व ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी यांनी केले.
  • या सोहळ्याला शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुं के, शिशु विभाग अध्यक्षा अमिता किराड, सतीश लिंबेकर, विजय पाचारणे, राजीव कुटे,प्राथमिक विभागाचे मुख्या ध्यापक पांडुरंग मराडे आणि नरेंद्र मेहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
  • सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उ त्स्फूर्त सहभागाने हा कार्यक्रम अत्यंत सोहळापूर्वक पार पडला.
  • उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एक बोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा.डॉ. ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles