काळविटाची शिकार; मटण विकणाऱ्यांना वन विभागाचा झटका…! 

  •  प्रतिनीधी : भारत साळुंखे :- माढा/सोलापूर (स्मार्ट सो लापूरकर डिजिटल मीडिया) : माढा तालुक्यातील बुद्रुक वाडी येथे संरक्षित वन्यप्राणी असलेल्या काळविटाची (Blackbuck) शिकार करून त्याचे मांस विकणाऱ्या रॅकेटचा वन विभागाने पर्दाफाश केला आहे.
  • या कारवाईत मांस विक्री करणाऱ्या दोघांसह ते खरेदी क रण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
  • मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाने बुद्रुक वाडी येथील लखन बबन काळे आणि त्याचा भाऊ विनोद बबन काळे यांच्या घरावर छापा टाकला.
  • घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी काळविटाचे मांस विक्रीसाठी ठेवल्याचे उघडकीस आले.
  • यावेळी मांस विकणारे दोन्ही भाऊ आणि मांस खरेदी कर ण्यासाठी आलेला ज्योतीराम आत्माराम नागटिळक या तिघांना वन पथकाने ताब्यात घेतले.
  • त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२च्या कलम २(१६), ९, ३९ आणि ५० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामगिरी
  • ही कारवाई सोलापूरचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह आ णि सहायक वनसंरक्षक (रोहयो) अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
  • मोहोळचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. बडे यांच्या नेतृ त्वाखाली वनपाल ए.डी.गायकवाड, वनरक्षक बी.डी. पटे कर,सी.एस.शिवशरण,ए.डी.राठोड आणि एस.आय. सय्य द यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
  • कठोर शिक्षेची तरतूद
  • काळवीट हा प्राणी वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या अनु सूची-१ (Schedule-1) मधील संरक्षित प्राणी आहे.
  • याची शिकार करणे गंभीर गुन्हा असून, दोष सिद्ध झाल्या स किमान ३ वर्षे ते कमाल ७ वर्षांचा कारावास आणि २५ हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.
  • अवैध शिकार, वृक्षतोड किंवा अवैध वाहतूक आढळल्या स नागरिकांनी त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles