
राष्ट्रीय छावा संघटना राजापूरतर्फे दि. १८ रोजी करक आंबा मांडवकर वाडी येथे भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा.
- प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- राष्ट्रीय छावा संघट ना राजापूर (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने शुक्रवार दि.१८ सप्टेंबर २०२६ रोजी करक आंबा (मांडवकर वाडी) येथे भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
- छावा संघटना रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मा.श्री.संतोष धा वडे तसेच राजापूर तालुका अध्यक्ष मा.श्री.राज मांडवकर व उपाध्यक्ष मा.श्री.अजय मांडवकर यांच्या नेतृत्वाखाली छावा संघटना राजापूर (महाराष्ट्र राज्य) दरवर्षी असे अने क समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करत असते.

- राजापूर तालुका या आगोदर असे अनेक कार्यक्रम आयो जित करण्यात आले.या कार्यक्रमातून समाजातील विविध लोकांना एकत्र आणून विविध विचारांची देवाणघेवाण होते.
- यामार्फत छावा संघटना राजापूर तालुक्यामध्ये प्रत्येक गा वात, प्रत्येक माणसांच्या मनात पोहोचावी..आणि संपूर्ण राजापूर तालुक्यात छावा संघटना नावलौकिक ला यावी हेच यामागचे उद्दीष्ट आहे.
- या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व टिमना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.
- या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री.अविनाश जी सौदळकर (द.रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मनसे) तसेच मा.श्री.दत्ताजी दिवाळे (राजापूर तालुका अध्यक्ष मनसे) व मा.सौ.चांदणी अनिकेत सावंत (नगरसेविका कुडाळ नगर पंचायत) आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
- या स्पर्धेसाठी मांडवकर वाडी उन्नती सेवा मंडळ करक मुंबई यांनी विशेष सहकार्य केले आहे.
- तालुक्यातील क्रिकेट प्रेमी, बंधू-भगिनी व सर्व खेळाडूंनी या भव्य क्रिकेट स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्सा हन द्यावे असे आवाहन राष्ट्रीय छावा संघटना राजापूर (म हाराष्ट्र राज्य) यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






