श्री क्षेत्र टेरव येथे गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप; चाकरमान्यांच्या उपस्थितीने सहा दिवस गाव फुलले.

  • प्रतिनीधी : चिपळूण : प्रमोद तरळ :- दसपटी विभागा तील श्री क्षेत्र टेरव येथे सहा दिवस भक्ती,श्रद्धा,उत्साह आ णि आनंदाने न्हाऊन निघालेल्या गौरी-गणपती उत्सवाची आज पारंपरिक पद्धतीने भावपूर्ण वातावरणात सांगता झाली.
  • “गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…!” या जयघोषाने टेरवचा आसमंत दुमदुमून गेला. लाडक्या गण रायाला निरोप देताना बाळगोपाळांपासून महिला, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ आणि चाकरमान्यांच्या डोळ्यांत आनंदा सोबतच बाप्पाच्या विरहाची हळवी भावना स्पष्टपणे जाण वत होती.
  • गणेश चतुर्थीपासून गेल्या सहा दिवसांपासून टेरव गावाती ल प्रत्येक वाडीतील घर भक्तीमय झाले होते.
  • सकाळ – संध्याकाळ गणरायाची आरती, भजन, नैवेद्य, प्र  साद तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण गावात मंग लमय वातावरण निर्माण झाले होते.
  • त्यात गौरी आगमनामुळे उत्सवाला पारंपरिक कोकणी सं स्कृतीचा आणि माहेरवाशिणीच्या आपुलकीचा सुंदर स्पर्श लाभला.
  • गणेशोत्सव म्हणजे चाकरमान्यांसाठी आपल्या मातीशी, आपल्या माणसांशी आणि आपल्या संस्कृतीशी पुन्हा एक दा जोडले जाण्याचा हक्काचा सण. मुंबई, पुणे, ठाणे, सुर त, बडोदा तसेच राज्याच्या विविध भागांत नोकरी- व्यवसा यानिमित्त स्थायिक झालेले टेरवचे चाकरमानी मोठ्या सं ख्येने गावी दाखल झाले होते.
  • त्यामुळे गावातील घराघरांत नातेवाईकांच्या भेटीगाठी, हा स्य – विनोद, आठवणी आणि आपुलकीने पुन्हा एकदा चैतन्य फुलले होते.
  • शनिवार दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच विसर्जना ची लगबग सुरू झाली. घराघरांत गणरायाची विधिवत पू जा व आरती करून बाप्पाला निरोप देण्याची तयारी करण्यात आली.
  • ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद, फुलांची उधळण आणि “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!” या जय घोषात गणरायाच्या विसर्जन मिरवणुका भक्तिभावाने मा र्गस्थ झाल्या.
  • बाळगोपाळांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, महिलांच्या भक्ति भावपूर्ण सहभागाने आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाने विसर्ज न सोहळ्याला विशेष भावनिक रंगत आली.
  • ज्याच्या आगमनाने घराघरांत आनंदाचा उत्सव सुरू झा ला, त्याच लाडक्या बाप्पाला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा नकळत पाणावल्या.
  • विसर्जनापूर्वी गणरायाची विधिवत पूजा व आरती करण्या त आली.
  • त्यानंतर “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!” असा एकच जयघोष करत भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
  • काही क्षणांसाठी वातावरणात उत्साह आणि विरह यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.
  • सहा दिवसांचा हा आनंदोत्सव संपला असला, तरी बाप्पा च्या आठवणी मात्र प्रत्येकाच्या मनात कायम राहणार आहेत.
  • गणरायाला निरोप देताना “बाप्पा, पुढच्या वर्षी पुन्हा याच प्रेमाने, याच उत्साहाने आणि याच भक्तिभावाने आमच्या घरी या…” अशी मनोमन प्रार्थना प्रत्येक भाविकाच्या अंतः करणातून उमटत होती.
  • गौरी-गणपती उत्सवाच्या निमित्ताने टेरव गावात श्रद्धा, भ क्ती, परंपरा, कौटुंबिक जिव्हाळा, सामाजिक एकोपा आ णि अस्सल कोकणी संस्कृतीचे मनोहारी दर्शन घडले.
  • गावाबाहेर असलेली माणसे पुन्हा गावाच्या मातीशी जोड ली गेली आणि घराघरांत नात्यांचा स्नेह अधिक दृढ झाला.
  • गणरायाला निरोप देताना टेरवच्या प्रत्येक घरातून “गणप ती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” ही एकच भाव ना व्यक्त होत होती.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles