
विलवडे रेल्वे स्थानकावर जन्मशताब्दी एक्स्प्रेसला थांबा द्या चिखलेवाडी ग्रामस्थ मंडळ,मूर मुंबई यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.
- प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :-जन्मशताब्दी एक्स्प्रेस १२०५१ (मुंबई – मडगाव सकाळी ११.३०) आणि जन्मश ताब्दी एक्स्प्रेस १२०५२ (मडगाव – मुंबई सायं १७.५०) या गाडीला विलवडे रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा.
- अशी मागणी चिखलेवाडी ग्रामस्थ मंडळ मूर मुंबई यांच्या वतीने ना.उदयजी सामंत (उद्योगमंत्री आणि पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा) तसेच मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यात आले.

- लांजा, राजापूर तालुक्यातील विलवडे स्थानकाच्या आस पासच्या ७० ते ८० गावातील चाकरमानी प्रवासी दररोज मोठ्या संख्येने विलवडे ते मुंबई व मुंबई ते विलवडे असा प्रवास करत असतात.
- जन्मशताब्दी एक्स्प्रेस ही एक मह त्त्वाची गाडी असून जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मडगाव जंक्शन अशी रोज धावते विलवडे रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा दिल्यास स्टेशनवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांना रोजच्या रोज प्रवास करता येईल व वेळही वाया जाणार नाही.

- आपण ही जनसमस्या सोडवून जन्मशताब्दी एक्स्प्रेसला विलवडे रेल्वे स्थानकावर थांबा मिळवून द्यावा असे मुख्य मंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/





