राजापूर तालुक्यातील दोनीवडे – गवळी वाडीतील कविस्कर कुटुंबियांच्या गणेशोत्सवाची शंभर वर्षांची परंपरा आजही अखंडीत सुरु.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यात निसर्गा च्या कुशीत वसलेल्या दोनीवडे-गवळीवाडी येथे कविस्कर कुटुंबीय गेल्या शंभर वर्षांपासून वास्तव्यास आहेत.
  • या कुटुंबाने सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा आजही अखंडपणे सुरू असून, संस्थापक तुळाजी लक्ष्मण कवि स्कर यांनी सुरू केलेल्या या उत्सवाची धुरा आता त्यांच्या चौथ्या पिढीतील तरुण पिढी उत्साहाने सांभाळत आहे.
  • कविस्कर कुटुंबातील गणेशोत्सवाची लगबग साधारणपणे दहीहंडी सणानंतरच सुरू होते. चौथ्या पिढीतील तरुण मु ले उत्साहाने सजावटीच्या तयारीला लागतात.
  • दरवर्षी नवीन संकल्पना, आकर्षक सजावट आणि कल्प कतेचा सुरेख मिलाफ या उत्सवात पाहायला मिळतो.
  • त्यामुळे गणेशोत्सवाच्या दिवसांत कविस्कर कुटुंबाचा घर गुती गणेशोत्सव हा परिसरातील आकर्षणाचा विषय ठरतो.
  • गणेश चतुर्थीच्या दिवशी विधिवत पूजन करून बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यानंतर दररोज सकाळी आणि रात्री पूजा-अर्चा व आरती केली जाते. कुटुंबातील लहानां पासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या धार्मिक कार्यक्रमात उ त्स्फूर्तपणे सहभागी होतात.
  • भक्तिभावाने भारलेले वातावरण संपूर्ण घरात अनुभवाय ला मिळते.
  •  दररोज बाप्पांसाठी विविध प्रकारचे नैवेद्य तयार करण्या ची जबाबदारी घरातील महिला वर्ग मोठ्या प्रेमाने आणि मनापासून पार पाडतो.
  • पारंपरिक पदार्थांसोबतच विविध खाद्यपदार्थांचा नैवेद्य बाप्पांना दाखविला जातो. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारा आनंदसोहळा ठरतो.
  • गौरीपूजनाच्या दिवशी तर उत्साहाला विशेष उधाण आले ले असते. गौरींचे आगमन, पूजन आणि पारंपरिक विधीं मुळे घरातील वातावरण आनंदाने आणि उत्साहाने भरून जाते.
  • कुटुंबातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या दिवसाचा आनंद स्प ष्टपणे दिसून येतो.
  • मात्र गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी बाप्पांच्या विसर्ज नाची वेळ जवळ आली की आनंदाच्या वातावरणावर विर हाची छाया पसरते. लाडक्या बाप्पांना निरोप देताना कुटुं बातील प्रत्येकाचे मन भावूक होते.
  • डोळ्यांत पाणी आणि ओठांवर पुढील वर्षी लवकर या, असा भाव घेऊन गणरायाला निरोप दिला जातो.
  • शंभर वर्षांपूर्वी सुरू झालेली ही गणेशोत्सवाची परंपरा आज चौथ्या पिढीनेही तितक्याच श्रद्धेने, उत्साहाने आणि आपुलकीने जपली आहे.
  • बदलत्या काळातही संस्कृती, परंपरा आणि कुटुंबातील ए कजूट जपणारा हा गणेशोत्सव निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles