कुणबी समाजोन्नती संघाच्या १०६ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त १ ऑक्टोबरला परळ येथील वाघे हॉलमध्ये समाजबांधवांचा भव्य मेळावा.

  • प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :-कुणबी समाजाच्या सा माजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक आणि राजकी य क्षेत्रातील प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई या मातृ संघटनेचा १०६ वा वर्धापन दिन सोहळा बुधवार, दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता परळ येथील वाघे हॉल, कुण बी ज्ञाती गृह येथे उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.
  • या सोहळ्याचे अध्यक्षस्थान संघाध्यक्ष मा.श्री.अनिल नवग णे भूषविणार आहेत.
  • गेल्या १०६ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीत कुणबी समा जाच्या संघटनात्मक बांधणीसोबतच सामाजिक प्रबोधन, शैक्षणिक विकास, आर्थिक उन्नती आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांना संघटनेने सातत्याने चालना दिली आहे.
  • प्रबोधनातून समाजाला नवी दिशा आणि संघटनातून वि कासाचा नवा विचार देण्याचे कार्य कुणबी समाजोन्नती संघाच्या माध्यमातून सुरू आहे.
  • बदलत्या सामाजिक परिस्थितीत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने पुढे जाण्याचा संदेश या वर्धापन दिन सोहळ्यातून दिला जाणार आहे.
  • या ऐतिहासिक वर्धापन दिन सोहळ्यास कुणबी समाजबां धव, भगिनी, युवा, महिला, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां नी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वा ढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
  • या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुणबी समाजोन्नती संघ, मुंब ई, कुणबी युवा मुंबई, कुणबी महिला मंडळ तसेच कुणबी विवाह सल्लागार मंडळ यांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles