
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या मागणीला यश सावंतवाडी टर्मिनसला निधी मंजूर.
- प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- मागील २५ वर्षात को कण रेल्वे मार्गावरील प्रवासी संख्येत प्रचंढ वाढ झालेली आहे.
- मात्र कोकणात सुसज्ज टर्मिनस नसल्याने रायगड, रत्ना गिरी व सिंधुदुर्ग जिल्हातील चाकरमन्यांना गोव्यातील मड गाव टर्मिनसवर विसंबून राहावे लागत होते.
- परिणामी आरक्षण कोटा विभागला जायचा व कोकणाती ल मोठया सणांच्या वेळी मागणी करणाऱ्यांनाच गणपती व शिमगा यासाठी जादा स्पेशल रेल्वे सोडूनही कोकणी माणसाला कन्फम तिकीटच मिळत नव्हते,यासाठी कोक णात टर्मिनस खूप महत्वाचे होते.

- प्रवासी संघटनेने सावंतवाडी टर्मिनसचे महत्व ओळखून दि.१६ मे २०२३ रोजी सावंतवाडी स्टेशनला प्रत्यक्ष जाऊ न स्टेशन मास्तर यांची भेट घेऊन,स्टेशनची पाहणी केली व यांना निवेदन दिले व रखडलेल्या टर्मिनसचे काम लव करात लवकर पुर्ण करण्याची तत्कालीन रेल्वेमंत्री श्री.पि युष गोयल यांच्याकडे मागणी करण्यात आली होती.
- तेव्हापासून या कामाचा पाठपुरावा सुरू होता. यासाठीच दि.१३ ऑग.२०२६ रोजी प्रवासी संघटनेची कोकण रेल्वे च्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या मिटींगमध्ये सावंतवाडी टर्मिनसच्या विषयावर प्रकर्षाने चर्चा करण्यात आली.
- त्यासाठी लवकरात लवकर निधी मंजूर करावा अशी वि नंती करण्यात आली होती त्याला आज यश मिळताना दिसत आहे असे अध्यक्ष श्री.शेखर बागवे यांनी सांगितले. याला माजी मंत्री श्री.दिपकजी केसरकर यांनीही दुजोरा दिला आहे.
- कोकण रेल्वेच्या विकास आराखड्यामध्ये सावंतवाडी ट र्मिनस व महाराष्ट्रातील रेल्वेचे दुहेरीकरण यावर भरीव निधी मिळणे अपेक्षित होते मात्र कोकणातील नेते सक्रीय नसल्याने ते शक्य होताना दिसत नाही.
- कारण मुंबईत ट्रान्सपोर्ट असल्याने कोकण रेल्वे मार्गावरी ल मेल / एक्सप्रेसची संख्या वाढवायची असेल तर प्रामु ख्यांने मुंबई ते सिंधुदुर्गच्या दरम्यानच्या कोकण रेल्वेचे दु हेरीकरण महत्वाचे असल्याचे प्रवासी संघटनेने कोकण रेल्वेला ठणकावून सांगितले होते.
- शिवाय सावंतवाडी स्टेशन येथे मुंख्य ५ प्लाटफॉर्मसोबत च, रेल्वे यार्ड,पिट लाईन,पिण्याचे पाणी,मेंटनस व साफ सफाई यांची व्यवस्था होणे खूप महत्वाचे असल्याचे प्रवा सी संघटनेने रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या दिनर्शनास आणून दिले होते.
- दि.२० जून २०१५ रोजी श्री.सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असता ना तत्कालीन मुंख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते सावंतवाडी टर्मिनसच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला मात्र हे काम मागील ११ वर्षात पुढे गेलेच नाही.
- कोकण रेल्वे मार्गावर सुसज्ज टर्मिनस झाल्यास मुंबई ते कोकणाच्या दरम्याने जादा रेल्वे चालवणे सोपे होईल, गणपती व शिमगा हे कोकणातील खूप मोठे सण याला मुंबईतील चाकरमनी लाखोच्या संख्येने कोकणातील आपल्या गावी जातात.
- मात्र कोकणात टर्मिनस नसल्याने सर्व गणपती स्पे.मडगा व ते मेंगलोर पर्यंत चालवाव्या लागतात परिणामी जादा रेल्वेच्या ३५० फेऱ्या चालवूनही कोकणातील चाकरमन्यां ना गणपतीचे कन्फम तिकीट मिळतच नव्हते.
- म्हणून कोकणात टर्मिनस होणे खूप महत्वाचे आहे,असे अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईचे सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी सांगितले अन्यथा गणपती बा प्पा कोकणात व सर्व गणपती स्पे.रेल्वे मडगाव व मेंगलोर पर्यत धावतानाच दिसतील.
- शेवटी उशिरा का होईना प्रवासी संघटनेच्या मागणीला य श येताना दिसत आहे व हे काम टप्प्या टप्याने होईल असे रेल्वे प्रशासनाने सुचवले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






